नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये काही पाणीपुरीच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यानंतर या तपासणीच्या निकालांमध्ये धक्कादायक माहिती समोर आली. अहवालानुसार, या पाणीपुरीच्या नमुन्यांमध्ये शरीरात कर्करोग निर्माण करणारे घटक आढळून आले. त्यांनतर शोरमाचेही काही नमुने तपासण्यात आले. यामध्येही असे जीवाणू (बॅक्टेरिया) आढळून आले, जे आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात. अन्नपदार्थांमध्ये घातक जीवाणू आढळल्यानंतर अन्न सुरक्षा विभागाने कारवाईला सुरुवात केली असून कर्नाटक राज्यातील विविध स्टॉलवर तपासणी करत आहेत. (Panipuri shawarma samples failed in test FSSAI issues new rules in Karnataka)
हेही वाचा : Politics : …तर वाजपेयींनीही देशात आणीबाणी लागू केली असती, संजय राऊतांचा दावा
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या (FSSAI) अधिकाऱ्यांनी कर्नाटक राज्यातील 10 जिल्ह्यांमधून शोरमाचे काही नमुने गोळा केले होते. बहुतांश नमुने हे निकृष्ट दर्जाचे आणि मानवी आरोग्यासाठी घातक असल्याचे आढळून आले. FSSAI च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, 17 पैकी 8 नमुने चाचणीमध्ये अपयशी ठरले आहेत. त्या नमुन्यांमध्ये यीस्ट आणि आरोग्यस हानिकारक असलेले जिवाणू सापडले आहेत. यामुळे मानवी आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. दरम्यान, सुरक्षा मानकांचे पालन न करणाऱ्या रेस्टॉरंटवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली.
हेही वाचा : Hathras Stampede : हाथरस दुर्घटनेत आयोजक, मुख्य सेवेदारावर एफआयआर; मृतांचा आकडा 124वर
शोरमाच्या तपासण्यापूर्वी पाणीपुरीचे नमुनेदेखील तपासण्यात आले होते. यामधील 22 टक्के पाणीपुरीचे नमुने सुरक्षा मानकांची पूर्तता करत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 260 नमुन्यांपैकी 41 नमुन्यांमध्ये कृत्रिम रंग आणि कर्करोग निर्माण करणारे पदार्थ आढळून आले. उर्वरित 18 नमुने हे मानवी शरीरासाठी योग्य नसल्याचे आढळून आले. दरम्यान, कर्नाटक सरकारने यावरून कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी खाद्यपदार्थ अधिक आकर्षित दिसावे यासाठी रंग देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रोडामाइन-बी (Rhodamine-B) या रसायनावर बंदी घातली आहे. आरोग्यमंत्री दिनेश गुंडू राव यांनी सांगितले की, विक्रेत्यांनी त्यांच्या उपाहारगृहात या रसायनांचा वापर केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.