घरदेश-विदेशPaper Leak : 5 वर्षांचा कारावास, लाखो रुपये दंड; पेपरफुटी रोखण्यासाठी केंद्र...

Paper Leak : 5 वर्षांचा कारावास, लाखो रुपये दंड; पेपरफुटी रोखण्यासाठी केंद्र सरकारचे विधेयक

Subscribe

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यात देशभरात पेपर फुटीची अनेक प्रकरणे समोर आली आहे. पेपर फुटीच्या प्रकरणांमुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला आहे. ज्यामुळे आता या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आज (ता. 05 फेब्रुवारी) या संदर्भातील विधेयक केंद्र सरकारकडून संसदेत सादर करण्यात आले आहे. The Public Examination (Prevention of Unfair Means) Bill, 2024 हे आज मोदी सरकारच्यावतीने केंद्रात सादर करण्यात आले आहे. या विधेयकामुळे देशभरातील पेपरफुटीच्या प्रकरणाला आळा घालता येणार आहे. (Paper Leak: Central government introduced a bill in the parliament to prevent paper leaks)

हेही वाचा… Teachers Recruitment : शिक्षक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी, भरती प्रक्रियेचा मुहूर्त निघाला

- Advertisement -

केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या या विधेयकामध्ये अनेक महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. ज्यामुळे पेपरफुटी करणाऱ्यांवर चाप बसणार आहे. या विधेयकात पेपरफुटीच्या प्रकरणात किमान तीन ते पाच वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर, संघटित गुन्हेगारीसाठी, विधेयकात 5 ते 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. दुसऱ्याच्या जागी परीक्षेला बसल्यास कठोर शिक्षेची आणि दंडाचीही तरतूद या विधेयकामध्ये करण्यात आली आहे. तर, अशा प्रकरणांमध्ये कोणताही गट किंवा संघटना सहभागी असल्यास त्यांची मालमत्ताही जप्त करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक संसदेत मांडले. पेपरफुटी आणि कॉपीच्या प्रकरणांचा तपास पोलीस उपअधीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून केला जाणार आहे. हा तपास केंद्रीय एजन्सीकडे सोपवण्याचा अधिकार सरकारला असेल.

केंद्र सरकारकडून हे विधेयक संसदेत सादर करण्यात आल्याने सध्या याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. कारण यामुळे पेपरफुटीच्या प्रकरणांना तर आळा बसेलच पण त्याचबरोबर विद्यार्थ्यांना देखील मोठा दिलासा मिळेल. त्याशिवाय, हा कायदा कडक केल्यास परीक्षांमधील हेरफेरी थांबविण्यात यश मिळेल, असा विश्वास केंद्र सरकारकडून व्यक्त करण्यात आलेला आहे. देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात पेपरफुटीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या घटनांमुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रासही सहन करावा लागला आहे. मागील महिन्यात तलाठी भरतीत पेपरफुटीची घटना घडल्याने गोंधळ उडाला होता. ज्या प्रकरणी अद्यापही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -