Republic Day Parade : सेंट्रल व्हिस्टाच्या राजपथावर होणार २६ जानेवारीची परेड, प्रथमच ड्रोनचीही असणार फौज

२६ जानेवारीचा यंदाचा प्रजासत्ताक दिन सोहळा अभूतपूर्व होणार आहे. कारण स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात होणाऱ्या समारंभाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य असलेल्या परेडचे आयोजन नव्या राजपथावर होणार आहे. त्याचप्रमाणे प्रथमच ड्रोनचीही फौज सुद्धा असणार आहे. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाअंतर्गत विजय चौक ते इंडिया गेटपर्यंत राजपथाच्या पुनर्विकासाचे काम होत असून ते शेवटच्या टप्प्यात आहे. तंत्रज्ञान, स्वदेशी आणि नाविन्याचा समावेश करण्यासाठी ड्रोन परडेचा अनोखा कार्यक्रम राबवला जाणार आहे.

प्रथमच ड्रोनचीही असणार फौज

राजपथावर होणाऱ्या परेडमध्ये आतापर्यंत देशातील संस्कृती आणि सुरक्षा दाखवण्यात येत होती. परंतु या परेडमध्ये आता देशभरातून स्पर्धेद्वारे निवडून येणारे प्रोफेशनल्स सुद्धा परेडमध्ये सहभाग घेणार आहेत. परेडसाठी प्रथमच १ हजार ड्रोनचा ताफा सज्ज आहे. त्याद्वारे तंत्रज्ञानाचे प्रदर्शन केले जाणार आहे. ५ मध्य आशियाई देशांच्या राष्ट्रध्यक्षांपुढे आकाशात तिरंगा, संविधान आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवही केला जाणार आहे.

वंदे मातरम स्पर्धेअंतर्गत ३२३ ग्रुप्सच्या ३ हजार ८७० स्पर्धकांतून ५०० नृत्य कलाकारांची निवड करण्यात आली आहे. ते शानदार आणि उत्कृष्ट असं नृत्य सादर करणार आहेत. वीरगाथा स्पर्धेत राष्ट्रनायकांवर गाणी, निबंध आणि कथा लिहिणारे २५ युवा विजेते निवडण्यात आले आहेत.

युद्धनायक आणि अमृत महोत्सवाच्या थीमवर चित्रकला

दिल्लीमधील इंडिया गेटजवळील समर स्मारकावर ५ हजार पेक्षा अधिक कुटुंबियांना एकाच वेळी सम्मानित केले जाणार आहेत. तर नव्या राजपथाच्या दोन्ही बाजूंना १५ फूट उंच दोन कॅन्व्हास सजवले जात आहेत. युद्धनायक आणि अमृत महोत्सवाच्या थीमवर चित्रकला केली जात आहे.

सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टअंतर्गत परेडसाठी आवश्यक असलेले राजपथ, लॉन, कालवा, पार्किंग एरिया आणि इतर जागांची उभारणी पूर्ण झाली आहे. ४ अंडरपास आणि ८ जनसुविधा केंद्रांचं काम अद्यापही पूर्ण झालेलं नाहीये. परेडदरम्यान व्हीआयपी रहदारी सुरळीत ठेवण्यासाठी कालव्यांवर १६ पूल उभारण्यात आले आहेत.


हेही वाचा : T20 Playing Conditions : षटकांची गती कमी झाल्यास बसणार दंड, टी२० सामन्यातील नियमांमध्ये मोठे बदल