Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश लोकांना पंगू करणे हे स्वातंत्र्य नाही, ठाकरे गटाचे मोदी सरकारवर टीकास्त्र

लोकांना पंगू करणे हे स्वातंत्र्य नाही, ठाकरे गटाचे मोदी सरकारवर टीकास्त्र

Subscribe

मुंबई : ‘मला पुन्हा एक संधी द्या. मी तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करेऩ,’ असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला स्वातंत्र्यदिनी दिले. मात्र यापूर्वी 2014 आणि 2019मध्ये दिलेल्या आश्वासनांचे व जनतेला दाखविलेल्या स्वप्नांचे काय झाले? ते आधी सांगा. पंतप्रधान मोदी 90 कोटी लोकांना फुकट रेशन देतात. त्या फुकट रेशनसाठी जनता भिकेचा कटोरा घेऊन रांगेत व रांगत उभी राहते. हेच विकास आणि प्रगतीचे लक्षण मानायचे काय? लोकांना असे पंगू करणे हे स्वातंत्र्य नाही, असे जोरदार टीकस्त्र ठाकरे गटाने सोडले आहे.

हेही वाचा – अजित पवार यांना शरद पवारांचा स्पष्ट इशारा, म्हणाले – “कोर्टात खेचेन…”

- Advertisement -

देशाचा 77वा स्वातंत्र्यदिन साजरा झाला, पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून राष्ट्रीय संबोधन केले, त्यात नवे काय होते? तेच, तेच आणि तेच. मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीस दहा वर्षे होत आली व लाल किल्ल्यावरचे त्यांचे हे नववे भाषण. मोदी व शहांनी घेतल्याच तर देश सार्वत्रिक निवडणुकांना सामोरा जाईल, असा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.

तिरंगा फडकावून भाषणे देणे हा उपचार
स्वातंत्र्यदिनी लोकशाहीच्या पिपाण्या वाजवणे, तिरंगा फडकवून भाषणे देणे हा एक उपचार झाला आहे. पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या भाषणात 140 कोटी लोकसंख्येचा उल्लेख केला. आपला देश लोकसंख्येच्या बाबतीत जगात पहिल्या क्रमांकावर असल्याचे पंतप्रधानांनी अभिमानाने सांगितले. देश स्वतंत्र झाला तेव्हा लोकसंख्या 40 कोटी होती. 77 वर्षांत आपण 140 कोटींवर पोहोचलो, पण 140 कोटी जनता स्वातंत्र्य मिळाल्याचे सुख खरोखर भोगत आहे काय? असा सवाल ठाकरे गटाने केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – “आम्ही फोटो वापरणारच..” शरद पवारांच्या इशाऱ्याला अजित पवार गटाचे प्रत्युत्तर

लाल किल्ल्यावरचा इव्हेंट
मोदी हे लोकशाही व संसदीय परंपरा मानायला तयार नाहीत, पण देशाच्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर जाऊन तिरंगा फडकवतात. कारण त्यांच्यासाठी तो एक ‘इव्हेन्ट’ ठरतो. मंगळवारच्या लाल किल्ल्यावरील भाषणात ‘‘मी पुन्हा येईन व 2024ला मीच तिरंगा फडकवेन’’ असे मोदींनी जाहीर केले. हा त्यांचा अहंकार आहे. ‘‘पुन्हा येईन’’ सांगणाऱ्यांची पुढे काय हालत होते ते त्यांनी महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे पाहून शिकायला हवे, असा टोलाही ठाकरे गटाने लगावला आहे.

- Advertisment -