घरक्रीडादिव्यांग असल्याने, देवाने माझ्याबरोबरचं असं का केलं....सिल्वर मेडल जिंकल्यानंतर DM सुहासची प्रतिक्रिया

दिव्यांग असल्याने, देवाने माझ्याबरोबरचं असं का केलं….सिल्वर मेडल जिंकल्यानंतर DM सुहासची प्रतिक्रिया

Subscribe

मोदींबरोबर बोलताना भावुक झालेल्या सुहासने सांगितलं की 'देवाने मलाच दिव्यांग का बनवलं असा मी विचार करायचो.

भारतीय बॅडमिंटनपटू आणि गौतम बु्द्ध नगरचे जिल्हाधिकारी सुहास एल यथिराज यांनी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सिल्वर मेडल जिंकत इतिहास रचला आहे. देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षावर होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही टिे्वट केले ्सून सुहासचे अभिनंदन केले आहे. तसेच फोनवरूनही त्याच्याशी संवाद साधला. यावेळी मोदींबरोबर बोलताना भावुक झालेल्या सुहासने सांगितलं की ‘देवाने मलाच दिव्यांग का बनवलं असा मी विचार करायचो. पण आता देवानेच मला मोदींबरोबर बोलण्याची संधी दिली. देवाच्या कृपेमुळे आणि मोंदीच्या आशिर्वादामुळेच मी सिल्वर मेडल जिंकलय. अशी प्रतिक्रिया सुहासने दिली आहे.

सुहासने सिल्वर मेडल जिंकताच मोंदींनी त्याला फोन केला होता. ‘तू देशाचं नाव उज्जवल केलंस. कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या दोन्ही राज्यांचा गौरव वाढवला आहेस’. यावर सुहासने मोदींचे आभार मानले. तसेच टोकियोला जाण्याआधी तुम्ही म्हणाला होतात. ‘की समोर कोण आहे ते बघू नकोस. तर तुझ्यातलं उत्तम असेल दे ते. मोंदींचे हेच शब्द मी मनात ठेवलं. त्यामुळेच मी सिल्वर पद मिळवू शकलो. असे सुहासने म्हटले .

- Advertisement -

लहानपणी कधी मेडल जिंकेन असा विचारही केला नव्हता
तसेच मी कर्नाटकमधील शिमोगा या छोट्याशा शहरातला आहे. लहानपणी मी कधी आयएएस होईल, कलेक्टर होईल . ऑलेंपिकमध्ये मेडल जिंकेल असा कधीही विचार केला नव्हता. पण देवाची कृपा आणि आशिर्वादामुळेच मी येथपर्य़त पोहचल्याचे सुहास यांनी म्हटले आहे.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -