बॉलिवूड अभिनेते आणि भाजप नेते परेश रावल त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. लवकरच होणाऱ्या विधानसभा निवडणूकीसाठी गुजरातमध्ये परेश रावल यांनी कॅम्पेन राबवले होते. याचं दरम्यानचा त्यांचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे. ज्यावरुन त्यांच्यावर अनेकजण टिका करु लागले आहेत. गुजरातमध्ये परेश रावल यांच्या भाजपा पक्षाचा प्रचार करण्यासाठी पोहोचले होते. जिथे त्यांनी लोकांनी संबोधित केलं आणि काही असं वक्तव्य केलं ज्यामुळे लोक भडले आहेत. आपल्या भाषणामध्ये परेश रावल यांनी रोहिंग्या मुस्लिमांचा उल्लेख केला आणि त्यामुळे त्यांच्या अडचणीत आता वाढ झालेली आहे.
काय म्हणाले परेश रावल?
परेश रावल यांनी गुजरातमधील वलसाड येथे गुजराती भाषेत लोकांना संबोधित केले. महागडे गॅस सिलिंडर आणि रोजगाराच्या मागणीबाबत त्यांनी सरकारच्या वतीने स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. यावेळी परेश रावल म्हणाले की, “‘गॅस सिलिंडर महाग असला तरी स्वस्त होणार आहे. लोकांना रोजगारही मिळेल, पण रोहिंग्या मुस्लिम आणि बांग्लादेशी तुमच्या आजूबाजूला राहू लागल्यावर काय होईल. जसं दिल्लीत होत आहे. तेव्हा तुम्ही गॅस सिलेंडरचे काय कराल? बंगाल्यांसाठी मासे शिजवणार का?”
तृणमूस काँग्रेसने केला विरोध
‘babu Bhai’
“Aap to Aise Na
The”!!!!
If Bangladeshis and
Rohingyas are entering
#India it means @AmitShah as Home
Minister is not doing job
properly! @SirPareshRawal
are you saying #BSF
doesn’t gaurd the borders
properly? https://t.co/MuaFTC73MY— Kirti Azad (@KirtiAzaad) December 1, 2022
परेश रावल यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. तेव्हापासून अनेकांनी ट्रोल करायला सुरुवात केली आहे.तृणमूस काँग्रेसने नेत्यांनी देखील याबाबात आवाज उठवला आहे.
परेश रावल यांनी मागितली माफी
of course the fish is not the issue AS GUJARATIS DO COOK AND EAT FISH . BUT LET ME CLARIFY BY BENGALI I MEANT ILLEGAL BANGLA DESHI N ROHINGYA. BUT STILL IF I HAVE HURT YOUR FEELINGS AND SENTIMENTS I DO APOLOGISE. 🙏 https://t.co/MQZ674wTzq
— Paresh Rawal (@SirPareshRawal) December 2, 2022
दरम्यान, हे सर्व प्रकरण चिघळत असल्याचे पाहून परेश रावल यांनी त्यांच्या ट्वीट अकाऊंटवरुन माफी मागितली आहे. त्यांनी ट्वीट करत लिहिलं की, “मासे हा मुद्दा मुळीच नाही. कारण गुजराती देखील मासे खातात. पण मी हे स्पष्ट सांगू इच्छितो की बंगाली म्हणजे बांग्लादेशी आणि रोहिंग्या मुस्लीम जे इथे बेकायदेशीरपणे राहतात. पण तरीही तुम्हाला वाईट वाटले असेल तर मला माफ करा.”
हेही वाचा :