Tuesday, April 13, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी पंतप्रधान मोदी येत्या ७ एप्रिलला विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधणार

पंतप्रधान मोदी येत्या ७ एप्रिलला विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधणार

Related Story

- Advertisement -

देशभरात कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढत असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले नियोजित कार्यक्रम पार पाडत आहेत. आता विद्यार्थ्यांसोबतचा वार्षिक संवाद ‘परीक्षा पे चर्चा’ ७ एप्रिलला संध्याकाळी ७ वाजता करणार आहेत. यावर्षी कार्यक्रम नव्या फॉर्मेटमध्ये असणार आहे, ज्यामध्ये काही इंटरेस्टिंग प्रश्नांची उत्तरे मोदी देणार आहेत. ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत बातचित करतात, त्यांच्या प्रश्नांची उत्तर देतात आणि परीक्षेचा तणाव दूर करण्यााठी काही टिप्स देतात. यावर्षी पहिल्यांदाचा कोरोनामुळे ही चर्चा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

यावर्षी संवाद कार्यक्रम ‘परीक्षा पे चर्चा’चे चौथे वर्ष आहे. या कार्यक्रमाची सुरुवात २०१८ साली दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये आयोजन करण्यात आला होता. परंतु यावर्षी कोरोना विषाणूच्या महामारीमुळे ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रम व्हर्च्युअल पद्धतीने आयोजित केला आहे.

- Advertisement -

यंदा या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षण देखील सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमासाठी २.६२ लाखांहून अधिक शिक्षक तर १०३९ विद्यार्थी आणि पालकांची नोंदणी झाली आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता नोंदणी करणे अत्यंत गरजेचे आहे. नोंदणी करण्याची शेवटी तारीख १४ मार्च होती. त्यामुळे आता नोंदणी प्रक्रिया बंद करण्यात आली आहे. या कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि परीक्षा पे चर्चा किट मिळेल. गेल्या वर्षी हा कार्यक्रम जानेवारीमध्ये झाला होता.


- Advertisement -

हेही वाचा – जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, नक्षलवादविरोधी संघर्ष अधिक तीव्र होणार- अमित शहा


 

- Advertisement -