Thursday, April 8, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी 'परीक्षा पे चर्चा'! पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार विद्यार्थी, शिक्षक, पालकांशी संवाद

‘परीक्षा पे चर्चा’! पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार विद्यार्थी, शिक्षक, पालकांशी संवाद

परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचा हा चौथा भाग आहे.

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रासह भारतामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे जवळपास सर्वच राज्यांमध्ये विविध निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यातच आता दहावी, बारावी आणि इतर इयत्तांच्या परीक्षांबाबत सर्वच संभ्रमात आहेत. याच पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी (आज) ‘परीक्षा पे चर्चा २०२१’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संध्याकाळी सात वाजता संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होईल. ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाचा हा चौथा भाग असून कोरोना महामारीमुळे यंदा पहिल्यांदाच हा कार्यक्रम आभासी स्वरूपात होणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान विद्यार्थ्यांना ताण-तणाव न घेता परीक्षेची तयारी कशी करावी, याविषयी उपयुक्त सूचना देणार आहेत.

आभासी स्वरूपातील आजच्या पहिल्याच ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात सर्वांशी संवाद साधणे अत्यंत रोचक ठरेल. यावेळी अनेक विषयांवर विस्तृत चर्चा होण्याची अपेक्षा आहे. तुम्ही परीक्षेला सामोरे जाणारे योद्धे असा, पालक किंवा मग शिक्षक असा, आजच्या चर्चेत सर्वांसाठी काही ना काही निश्चित असेल. आपण सगळे मिळून परीक्षा तणावमुक्त करुया, असे पंतप्रधान मोदी त्यांच्या ट्विटमध्ये म्हणाले.

- Advertisement -

या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण डीडी सह्याद्रीवर मराठीत उपलब्ध असेल. त्याशिवाय हिंदी, आसामी, बांग्ला, उडिया, गुजराती, कन्नड, तेलगु, तमिळ आणि मल्याळम या भाषांमधेही या कार्यक्रमाचे प्रसारण केले जाईल. ‘परीक्षा पे चर्चा’ हा मुख्य कार्यक्रम अनेक डिजिटल प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध असेल. EduMinofIndia, narendramodi, pmoindia, pibindia, DD National, MyGovIndia, DDNews, RajyaSabhaTV, SwayamPrabha या सर्व डिजिटल पोर्टलच्या फेसबुक आणि युट्यूब चॅनल्सवरून संध्याकाळी सात वाजल्यापासून हा कार्यक्रम दाखवला जाणार आहे.

- Advertisement -