Parker Solar Probe : नासाच्या अंतराळ यानाने पहिल्यांदाच केला सूर्याला स्पर्श

Parker Solar Probe: NASA spacecraft touches the sun for the first time
Parker Solar Probe : नासाच्या अंतराळ यानाने पहिल्यांदाच केला सूर्याला स्पर्श

प्रचंड आगीचा गोळा आणि प्रचंड उष्णता अशी सूर्याची ओळख आहे.असं म्हणतात की सुर्य,आग,पाणी या गोष्टींशी कधीही खेळू नये.नासाच्या शास्त्रज्ञांनी एक अनोखी कामगिरी पार पाडली आहे.नासाकडून अंतराळातील अनेक गोष्टींवर संशोधन करण्यात येते.सूर्याचे संशोधन करताना नासाच्या अंतराळ यानाने पहिल्यांदाच सूर्याला स्पर्श केला आहे. सूर्याच्या वातावरणात शिरुन यानाने एक प्रदक्षिणा घातली असून, सूर्याच्या वातावरणात या नासाच्या यानाने प्रथमच स्पर्श केला आहे.नासाचे हे मोठे संशोधन आहे. पार्कर सोलर प्रोब या अंतराळ यानातून डेटा मिळवण्यासाठी नासाला अनेक महिने लागले त्याचप्रमाणे त्यांना त्याची पुष्टी करण्यासाठी अनेक महिने लागले.२८ एप्रिलमध्ये प्रोबने सूर्याला ही प्रदक्षिणा मारल्याचे जाहीर केले आहे.

पार्कर सोलर प्रोब २०१८ ला केला होता लॉन्च

जॉन हॉपकिंस युनिव्हर्सिटीच्या प्रोजेक्टचे संशोधक नूर रौफी यांनी सांगितले की, हे पार्कर सोलर प्रोब २०१८ मध्ये प्रक्षेपित करण्यात आले होते. जेव्हा पार्करने प्रथम सौर वातावरण आणि सौर वारे पार केले तेव्हा तो सूर्याच्या केंद्रापासून १३ दशलक्ष किलोमीटर अंतरावर होता.

हनुमानाने सूर्याला गिंळकृत केले,अशी आख्यायिका…

हनुमानाने सूर्याला गिंळकृत केले तर संपूर्ण सृष्टीचा विनाश होईल, या जाणीवेने भयभीत होऊन देवांचा राजा इंद्राने हनुमानावर वज्रास्त्राने प्रहार केला. या वज्रास्त्राची तुलना आजच्या काळातील न्युक्लिअर मिसाईलशी केली तर याच्या आघाताने कोणाचाही विनाश होईल. पण वज्रास्त्राच्या प्रहाराने हनुमानाच्या जबड्यावर जखम झाली व काही क्षणासाठी हनुमान मुर्छित झाले.अशी आख्यायिका आहे.


हे ही वाचा – मोहदरी घाटात स्विफ्ट कार अपघातात दोन ठार, दोन जखमी