घरअर्थजगतलॉकडाऊनमध्ये 'पार्ले-जी'ची रेकॉर्ड ब्रेक विक्री; ८२ वर्षांचा विक्रम मोडला!

लॉकडाऊनमध्ये ‘पार्ले-जी’ची रेकॉर्ड ब्रेक विक्री; ८२ वर्षांचा विक्रम मोडला!

Subscribe

इतिहासात विकल्या जाणार्‍या सर्वाधिक बिस्किटांचा विक्रम पार्लेने तयार केला

कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसायांचे नुकसान होत असले तरी पार्ले-जी बिस्किटांची विक्री वाढली असून गेल्या ८२ वर्षातील विक्रम मोडला आहे. अवघ्या ५ रुपयांत मिळणारे पार्ले-जी बिस्किटाचा पुडा शेकडो किलोमीटर पायी चालणार्‍या स्थलांतरित मजुरांसाठी खूप फायदेशीर ठरला. काहींनी ते स्वत: विकत घेतले तर काहींनी इतरांच्या मदतीसाठी ही बिस्किटं वाटली. लॉकडाऊन दरम्यान बर्‍याच लोकांनी पार्ले-जी बिस्किटांचा साठा देखील त्यांच्या घरात केल्याचे दिसून आले.

८ दशकांमधील रेकॉर्ड ब्रेक विक्री

१९३८ पासून पार्ले-जी लोकांमध्ये एक आवडता ब्रँड आहे. लॉकडाऊनदरम्यान पार्ले-जीची विक्री विक्रमी स्तरावर पोहोचली असून इतिहासात विकल्या जाणार्‍या सर्वाधिक बिस्किटांचा विक्रम पार्लेने तयार केला आहे. पार्ले प्रॉडक्ट्सने पार्ले-जी बिस्किटांच्या विक्रीचे आकडे देण्यास नकार दिला. परंतु यंदाच्या मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात पार्ले-जी बिस्किटांची विक्री ही मागील आठ दशकांमधील सर्वाधिक ठरल्याचे सांगितले आहे.

- Advertisement -

कंपनीचा शेअर जवळपास ५ टक्क्यांनी वाढले

कंपनीचा एकूण मार्केट शेअर जवळपास ५ टक्क्यांनी वाढला असून यापैकी ८० ते ९० टक्के वाढ पार्ले-जी बिस्किटांच्या विक्रीतून झाली आहे. तसेच कोरोना संकटादरम्यान अनेक राज्य सरकारांनी आणि सामाजिक संस्थांनी मोठ्या प्रमाणात पार्ले-जी बिस्किटांची खरेदी केली, असल्याची माहिती पार्ले प्रॉडक्ट्सचे कॅटेगरी हेड मयांक शाह यांनी दिली.

स्थलांतरित मजुरांचा पार्ले-जी झाला आधार

कोरोनादरम्यान बहुतांश लोकांनी घरात चहासोबत खाण्यासाठी पार्लेजी बिस्किटांची खरेदी केली. तर आर्थिक परिस्थिती चांगली असलेल्या लोकांनी पायी प्रवास करणाऱ्या मजुरांना देण्यासाठीही पार्ले जी बिस्किटांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली होती. या संकटादरम्यान स्थलांतरित मजुरांचा पार्ले-जी आधार झाला तर शहरातून आपल्या गावाला परतणाऱ्या स्थलांतरित मजुरांनीही वाटेत पार्ले जी बिस्किटांच्या माध्यमातून आपली, कुटुंबीयांची आणि मुलांची भूक देखील भागवण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

ब्रिटानियाची बिस्किटांचीही चांगली विक्री

केवळ पार्ले-जीच नाही, गेल्या तीन महिन्यांत लॉकडाऊन दरम्यान इतर कंपन्यांच्या बिस्किटांनीही बरीच विक्री केली. तज्ज्ञांच्या मते, ब्रिटानियाच्या गुड डे व्यतिरिक्त टायगर, मिल्क बिकिस, बार्बर्न आणि मेरी बिस्किट्स, क्रेकजॅक, मोनॅको, हाईड अँड सीक सारख्या पार्लेचे बिस्किटेही विकले गेले.


BSNL ने लाँच केला ७८ रुपयांचा प्लॅन, रोज मिळणार 3GB डेटा आणि फ्री कॉलिंग सुविधा
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -