घरदेश-विदेशParliament Budget Session: खर्गे म्हणाले, अब की बार 400 पार...; अन् सभागृहात...

Parliament Budget Session: खर्गे म्हणाले, अब की बार 400 पार…; अन् सभागृहात पिकला हशा

Subscribe

शुक्रवारी राज्यसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपाची घोषणा - अबकी बार 400 पार ... असं म्हटलं आणि संपूर्ण सभागृहात एकच हशा पिकला.

नवी दिल्ली: देशाचा अंतरिम अर्थसंकल्प गुरुवारी सभागृहात सादर करण्यात आला. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील या शेवटच्या अर्थसंकल्पासाठी बोलावलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शुक्रवारीही चर्चा सुरू होती. शुक्रवारी राज्यसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपाची घोषणा – अबकी बार 400 पार … असं म्हटलं आणि संपूर्ण सभागृहात एकच हशा पिकला. शुक्रवारी सभागृहात झालेल्या चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदीही राज्यसभेत उपस्थित होते. (Parliament Budget Session Mallikarjun Kharge said now 400 par And there was laughter in the hall)

थोडक्यात, मल्लिाकर्जुन खर्गे यांना म्हणायचं होतं की, तुमच्याकडे बहुमत आहे. तरीही तुम्ही महिला आरक्षण विधेयकाची अंमलबजावणी करत नाहीत. पण बोलताना मात्र, ते म्हणाले की आता यावेळी तर मोदी सरकार 400 पार होणार आहे.. त्यांनी असं म्हणताच सभागृहातील सर्व भाजपच्या नेते हसू लागले. इतकचं नाही तर पंतप्रधान मोदीही स्वत:चं हसू रोखू शकले नाहीत. पाहा व्हिडीओ….

- Advertisement -

वास्तविक मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजप सरकारच्या धोरणांचा समाचार घेतला होता. मोदी सरकार उच्च शिक्षणातील आरक्षण संपवत असून, महिला आरक्षण विधेयकाची अंमलबजावणी करत नाही, अशी टीका त्यांनी केली. खर्गे यांनी शिक्षण केंद्रांमधील प्राध्यापक, व्याख्याता आणि इतर पदांच्या रिक्त पदांमधील ओबीसी पदे रद्द करण्याबाबत यूजीसीच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांवर चिंता व्यक्त केली आणि केंद्र सरकारवर आरक्षण संपविण्याचा कट रचल्याचा आरोप केला. केंद्र सरकार महिला आणि ओबीसींबाबत बोलते मात्र त्यांना आरक्षण देण्यास टाळाटाळ करत असल्याचेही ते म्हणाले. ओबीसी आरक्षण संपुष्टात आणले जात असेल तर महिला आरक्षणाचे विधेयक मंजूर झाले मात्र रणनीतीनुसार त्याची अंमलबजावणी झाली नाही, असं खर्गे म्हणाले.

- Advertisement -

(हेही वाचा: Amalner Sahitya Sammelan : तरुणांच्या ऊर्जेचा अंत पाहू नका, प्रलय येईल; संमेलनाध्यक्षांचा सरकारला इशारा )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -