Saturday, July 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश Parliament Monsoon Session: कठीण प्रश्न विचारा पण शांततेत चर्चा करा; मोदींचं विरोधकांना...

Parliament Monsoon Session: कठीण प्रश्न विचारा पण शांततेत चर्चा करा; मोदींचं विरोधकांना आवाहन

Related Story

- Advertisement -

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांसमोर येऊन संबोधित केलं. यावेळी त्यांनी कठीण प्रश्न विचारा पण शांततेत चर्चा करा, असं आवाहन विरोधकांना केलं. तसंच, कोरोनाविरोधातल्या लढाईत सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, असं देखील म्हणाले.

पंतप्रधान मोदी अधिवेशन सुरु होण्याआधी मांध्यमांसमोर येऊन संबोधित करताना संसदेत कोरोना नियम पाळले पाहिजेत, असं आवाहन केलं. कोरोनामध्ये आतापर्यंत ४० कोटी लोक बाहुबली झाले आहेत. कोरोनाने देशासह जगातील संपूर्ण मानवजातीला वेढलं आहे. या अधिवेशनात अर्थपूर्ण चर्चा व्हायला हवी, जेणेकरून कोरोनाविरुद्धची लढाई अधिक धारदार होईल अशी आमची इच्छा आहे. मी सर्व नेत्यांना विनंती केली आहे. आम्हाला सभागृहात तसंच बाहेरही चर्चा हवी आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी कठीणातील कठीण प्रश्न विचारावेत. पण सरकारला उत्तर देण्याची देखील संधी द्यावी, असं मोदी म्हणाले.

- Advertisement -

आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशनात शेतकरी आंदोलन, महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांवर विरोधी पक्ष सरकारला घेरण्याच्या प्रयत्नात आहे. त्याचबरोबर सरकारने विरोधकांचे हल्ले रोखण्यासाठी मोठ्या योजनाही आखल्या आहेत, परंतु अधिवेशनाच्या एक दिवस आधी पेगासस हॅकिंग वादामुळे यावेळचं संसदेच अधिवेशन गाजणार आहे.

पेगासस हॅकिंग वादाचे पडसाद संसदेत पुन्हा उमटणार आहेत. आंतरराष्ट्रीय मीडियाद्वारे असा दावा करण्यात आला आहे की भारतातील अनेक पत्रकार, राजकारणी आणि इतरांचे फोन पेगासस सॉफ्टवेअरचा वापर करून हॅक करण्यात आले होते. हा खुलासा होताच राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधी पक्षांनी लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही ठिकाणी या विषयावर चर्चा करण्याची मागणी मागणी केली असून स्थगन प्रस्ताव देण्यात आला आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -