घरदेश-विदेशआजपासून संसदेच पावसाळी अधिवेशन; अग्निपथसह अनेक मुद्द्यावरून विरोधक होणार आक्रमक

आजपासून संसदेच पावसाळी अधिवेशन; अग्निपथसह अनेक मुद्द्यावरून विरोधक होणार आक्रमक

Subscribe

यादरम्यान अग्निपथ योजना, केंद्रीय तपास यंत्रणांचा कथित गैरवापर, महिला आरक्षण आणि महागाई अशा विविध विषयांवर विविध पक्षांनी चर्चेची मागणी केली

संसदेच पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. हे अधिवेशन 12 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. अधिवेशनादरम्यान 18 बैठका होणार असून 24 विधेयके मांडली जाणार आहे. या अधिवेशनात अग्निपथ योजनेसह विविध मुद्द्यावरून विरोधकांकडून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दरम्यान रविवारी पावसाळी अधिवेशानापूर्वी सरकारने सर्व पक्षांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीत 25 मुद्द्यांवर विरोधी पक्षांनी चर्चा करण्याची मागणी केली. मात्र या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी अनुपस्थित असल्याने काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा : संसद भवन परिसरात निदर्शनं, आंदोलनं, उपोषण करण्यास बंदी; धार्मिक कृतींनाही मनाई

- Advertisement -

यावेळी सरकारचा भाग असलेल्या अपना दलने केंद्राकडे जातीय जनगणेबाबत लवकर निर्णय घेण्याची मागणी करक सरकारी नोकऱ्यांमधील अनुशेष संपवण्यासाठी धोरण तयार करणाचे आवाहन केले. यादरम्यान अग्निपथ योजना, केंद्रीय तपास यंत्रणांचा कथित गैरवापर, महिला आरक्षण आणि महागाई अशा विविध विषयांवर विविध पक्षांनी चर्चेची मागणी केली. या सर्वपक्षीय बैठकीत विविध 36 पक्षांचे नेते उपस्थित होते. यात भाजप काँग्रेस, टीएमसी, राष्ट्रवादी काँग्रेस, द्रमुक, सपा, बसपा, आरजेडीच्या नेत्यांचा समावेश होता.

दरम्यान विरोधकांकडून महागाई, अग्निपथ योजना, बेरोजगारी, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर आणि घसरत चाललेल्या रुपयाच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेची स्थिती यासारख्या या प्रमुख मुद्यांवरून सरकारला घेरण्याची तयारी सुरु आहे.

- Advertisement -

जाणून घ्या! राष्ट्रपतीपदाची निवडणूक कशी होते? मतमोजणीचं गणित कसं असतं?

अधिवेशनापूर्वी काँग्रेस- भाजपमध्ये रंगला वाद

रविवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीतील पंतप्रधान मोदींच्या अनुपस्थितीवर काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदींची अनुपस्थिती हे असंसदीय नाही का? असा सवाल त्यांनी विचारला आहे.

जयराम रमेश यांच्या टीकेला आता संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मनमोहन सिंह पंतप्रधान असताना किती सर्वपक्षीय बैठकांना गेले होते? तर काही प्रसंगी पंतप्रधान मोदींनी बहुतांश सभांना हजेरी लावली आहे. अशा शब्दात त्यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. दरम्यान संसदेच्या अधिवेशनापूर्वी असंसदीय शब्दांबाबत मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली, यावरूनही विरोध चांगलेच संतापले आहेत. यामुळे विरोधक आता सरकारवर हल्लाबोल करण्याची एकही संधी सोडणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.


शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या याचिकांवर सुप्रीम कोर्टात बुधवारी सुनावणी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -