Parliament Special Session : संसदेच्या पाच दिवसीय विशेष अधिवेशनाला (Parliament Special Session) आज (18 सप्टेंबर) सुरूवात झाली. पहिल्या दिवशी जुन्या इमारतीत कारवाईला सुरूवात झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लोकसभेत (Loksabha) चर्चेला सुरुवात केली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार (NCP) सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पंतप्रधान मोदींच्या भाषणाचे कौतुक करत टोलाही लगावला आहे. त्यांनी म्हटले की, प्रदीर्घ कालावधीनंतर पंतप्रधानांनी कुशल राजकारण्याप्रमाणे संसदेला संबोधित केले. मात्र त्यांनी सुषमा स्वराज आणि अरुण जेटली या सहकारी संघराज्यावर विश्वास ठेवणाऱ्या दोन व्यक्तींची नावे त्यांनी घेतली नसल्याची खंतही व्यक्त केली. (Parliament Special Session PM Narenera Modi Supriya Sule Sushama Swaraj Arun Jaitley)
हेही वाचा – Parliament Special Session : प्रबळ विरोधकांना ईडीमार्फत कमकुवत करण्याचा प्रयत्न; सरकारवर आरोप
पंतप्रधान मोदींचे कौतुक करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पंतप्रधानांच्या आजच्या भाषणाचे मी कौतुक करते. जिथे त्यांनी प्रशासन म्हणजे सातत्य असल्याचे कौतुक केले. आपल्या सर्वांना समान प्रिय असलेल्या या देशाच्या उभारणीत गेल्या 7 दशकांमध्ये विविध लोकांनी योगदान दिले आहे. तुम्ही इंडिया म्हणा किंवा भारत, हा आपला देश आहे. आपण सर्व याठिकाणी जन्मलो आलो आहोत, आपण सर्व इथे येऊन धन्य झालो आहोत.
#WATCH | NCP MP Supriya Sule says, “…I appreciate the PM’s speech today where he appreciated that governance is continuity. Various people have contributed over the last 7 decades to build this country which we all love equally. Whether you call it India or Bharat, it is your… pic.twitter.com/UYMOx0G8Po
— ANI (@ANI) September 18, 2023
सुषमा स्वराज आणि अरुण जेटलींचा मोदींकडून भाषणात उल्लेख नाही
सुषमा स्वराज आणि अरुण जेटलींबद्दल बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आज नरेंद्र मोदींनी ज्यांचा उल्लेख केलेला नाही अशा दोन व्यक्तींना मी रेकॉर्डवर ठेवू इच्छितो. ज्यांच्यामुळे माझ्या संसदीय कार्यात माझा खूप प्रभाव आहे, जे भाजपामधून आले आहेत. सुषमा स्वराज आणि अरुण जेटली ज्यांचा आपण सर्वच आदर केला आहे. हे दोघे महान नेते आणि असामान्य संसदपटूंपैकी एक होते, असे मला अजूनही वाटते. ते सहकारी संघराज्याबद्दल बोलत राहिले.
सुप्रिया सुळेंनी मांडली महिला आरक्षण विधेयकाची बाजू
महिला आरक्षण विधेयकाचे समर्थन करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, देशाला पहिल्या महिला राष्ट्रपती (प्रतिभा पाटील), पहिल्या महिला पंतप्रधान (इंदिरा गांधी) आणि पहिल्या महिला लोकसभा अध्यक्ष (मीरा कुमार) काँग्रेसने दिली. एवढेच नाही तर महिला आरक्षण विधेयकही काँग्रेसने आणले. महिलांना 33 टक्के आरक्षण देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले याचा मला अभिमान आहे. आजपर्यंत सभागृहात उपसभापतीपद रिक्त ठेवल्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी सत्ताधारी पक्षावर टीका केली. त्यांनी उद्या संसदेच्या नवीन इमारतीत प्रवेश केल्यानंतर किमान उपसभापतींच्या नियुक्तीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.
भ्रष्टाचाराच्या कोणत्याही तपासात आम्ही सर्वजण एकत्र
भाजपाच्या एका सदस्याने भ्रष्टाचारावर केलेल्या टिप्पणीवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, भ्रष्टाचाराच्या कोणत्याही तपासात आम्ही सर्वजण एकत्र आहोत. त्यामुळे एक तासाचा प्रश्नोत्तराचा तास कोणत्याही प्रकारे खंडित होणार नाही, याचे प्रयत्न करण्याची कोणतीही गरजही नाही, असा टोलाही त्यांनी भाजपाला लगावला.