घर देश-विदेश Parliament Special Session : प्रबळ विरोधकांना ईडीमार्फत कमकुवत करण्याचा प्रयत्न; सरकारवर आरोप

Parliament Special Session : प्रबळ विरोधकांना ईडीमार्फत कमकुवत करण्याचा प्रयत्न; सरकारवर आरोप

Subscribe

Parliament Special Session : संसदेच्या पाच दिवसीय विशेष अधिवेशनाला (Parliament Special Session) आज (18 सप्टेंबर) सुरूवात झाली. पहिल्या दिवशी जुन्या इमारतीत कारवाईला सुरूवात झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लोकसभेत (Loksabha) चर्चेला सुरुवात केली. मात्र त्याचवेळी विरोधकांकडून सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. काँग्रेस नेते (Congress) मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) म्हणाले की, जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) यांचा असा विश्वास होता की, जर मजबूत विरोधक नसेल तर ते योग्य नाही. मात्र सध्या विरोधकांकडून जोरदार विरोध होत असताना तपास यंत्रणांच्या माध्यमातून तो कमकुवत करण्यावर भर दिला जात आहे, असा आरोप केला आहे. (Parliament Special Session Efforts to weaken strong opposition through ED Accusations on Govt)

विशेष अधिवेशनादरम्यान बोलताना मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, मला संसदेत कमी नेत्यांचे ऐकण्याची संधी मिळाली. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी पंतप्रधान असताना देशाचा पाया रचला जात होता. पायात पडलेले दगड दिसत नाहीत. भिंतीवर जे लिहिले आहे तेच दिसते, अशा कवितेच्या ओळी म्हणत खर्गेंनी अध्यक्षांना म्हटले की, तुम्ही खूप दिलदार आहात. त्यामुळे मी तुम्हाला संजय सिंग आणि राघव चड्ढा यांना परत बोलावण्याची विनंती करतो. कारण श्रीमंत, गरीब, सुशिक्षित किंवा अशिक्षितांसाठी तुमचे मत एकच असेल. अदानीसारख्या श्रीमंत लोकांबद्दल सुद्धा तुमचे एकच मत असेल. त्यामुळे तुम्ही आम्हाला इंडी म्हणा किंवा आणखी काही म्हणा, आम्ही इंडिया आहोत. नाव बदलून काही होत नाही. भारत हा अशिक्षित असलेला देश आहे, असे अनेकांना वाटत होते. गेल्या 70 वर्षांत आम्ही काय केले, असा प्रश्न वारंवार विचारला जातो आहे. आम्ही 70 वर्षात लोकशाही मजबूत केली. त्यामुळे तुमच्याकडे जर काही बोलायला नसेल तर एवढे तरी बोला, असा टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.

- Advertisement -

हेही वाचा – संसदेत मोदींचे 50 मिनिटांचे अखेरचे भाषण: नेहरु, इंदिरा गांधीची स्तुती, संसदेवरील हल्ल्याला म्हटले आत्म्यावरील हल्ला

75 वर्षात या देशाचा चेहरामोहरा बदलला

मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, आपल्या देशात सत्तेचे हस्तांतरण बळाच्या जोरावर झालेले नाही. गांधीजींनी जे स्वातंत्र्य मिळवले ते अहिंसेवर आधारित होते. या इमारतीत 75 वर्षात देशाचा चेहरामोहरा बदलला आहे. वेगाने प्रगती करण्यासाठी जवाहरलाल नेहरू सर्वांना बरोबर घेऊन जात होते. त्यांनी आपल्या पहिल्या मंत्रिमंडळात विरोधी पक्षातील लोकांना समाविष्ट केले होते. मात्र सध्याच्या सत्ताधाऱ्यांना विरोधकांची सावलीही बघायची नाही. नेहरू यांनी विरोधी पक्षाच्या नेत्याला मंत्री केले होते. ते विरोधी पक्षातील नेत्यांचे लक्षपूर्वक ऐकत होते. मात्र आता लोक संसदेतही येत नाहीत, असा टोला त्यांनी नरेंद्र मोदींना लगावला.

- Advertisement -

विरोधकांना ईडीमार्फत कमकुवत करण्याचा प्रयत्न

जवाहरलाल नेहरूंबद्दल बोलताना मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, ज्या व्यक्तीने 14 वर्षे तुरुंगात काढल्यानंतर सत्तेवर आल्यावर मोठे-मोठे कारखाने उभारले. नेहरूंचा असा विश्वास होता की प्रबळ विरोधी पक्ष नसणे म्हणजे व्यवस्थेत काहीतरी दोष आहे. मात्र आता विरोधकांकडून जोरदार विरोध झाला तर ईडी आणि सीबीआय त्यांच्या घरी पाठवले जाते, असा आरोप करताना मल्लिकार्जुन खर्गेंनी मणिपूरबद्दल बोलताना नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. पंतप्रधान देशाच्या प्रत्येक भागाला भेट देतात, पण ते मणिपूरला का जात नाहीत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जुन्या संसदेत दिला ‘या’ आठवणींना उजाळा

काँग्रेस सरकारने देशाला खूप काही दिले

लोकसभेत विरोधकांवर निशाणा साधताना काँग्रेस नेते अधीर रंजन म्हणाले की, या सभागृहाने देशाला खूप काही दिले आहे. याच सभागृहात बँकेचे राष्ट्रीयीकरण झाले होते, आयटी क्षेत्रात क्रांती घडवून आणली होती. डिजिटल इंडिया आणि पंचायती राज आणणारे राजीव गांधी होते. राजीव गांधींनी देशात सामाजिक क्रांती घडवून आणण्याचे काम केले. माहितीच्या अधिकारात आणण्याचे काम काँग्रेस सरकारने केले होते. मनरेगा कायदा आणण्याचे काम काँग्रेस सरकारने केले. काँग्रेस सरकारच्या काळात अन्न सुरक्षा कायदा आणला गेला. चांद्रयानाबाबत आज चर्चा होताना दिसत आहे. पण मला सांगायचे आहे की, 1946 मध्ये जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली अणु संशोधन समिती स्थापन करण्यात आली होती. त्यानंतर काँग्रेसने 1964 मध्ये इस्रोचा विकास केला. आज आपण इस्रोला काय म्हणणार, भारतीय अंतराळ संशोधन संस्था की अजून काही? भारत आणि इंडिया हा वाद कुठून निर्माण झाला? असे प्रश्नही अधीर रंजन चौधरी यांनी उपस्थित केले.

- Advertisment -