घरदेश-विदेशParliament Special Session : मी खुलेपणाने चर्चा करण्यास तयार; चीनबाबत संरक्षणमंत्र्यांचे काँग्रेसला...

Parliament Special Session : मी खुलेपणाने चर्चा करण्यास तयार; चीनबाबत संरक्षणमंत्र्यांचे काँग्रेसला प्रत्युत्तर

Subscribe

Parliament Special Session : संसदेच्या विशेष अधिवेशनात बुधवारी (20 सप्टेंबर) लोकसभेत महिला आरक्षण विधेयक पास झालं. यानंतर आज (21 सप्टेंबर) राज्यसभेत महिला आरक्षण विधेयकावर चर्चा होत आहे. लोकसभेत पंतप्रधान मोदींनंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज विरोधकांकडून मिळालेल्या सहकार्याचे कौतुक करत चर्चा करत होते. यावेळी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी आणि राजनाथ सिंह यांच्यात बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. राजनाथ सिंह महिला आरक्षण विधेयकावर चर्चा करत असताना अधीर रंजन चौधरी वारंवार त्यांना थांबवत होते आणि चीनच्या मुद्द्यावर बोलण्यास सांगत होते. मी चीनच्या मुद्द्यावर खुलेपणाने चर्चा करण्यास तयार असल्याचे सांगत राजनाथ सिंह यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. (Parliament Special Session I am ready to discuss openly Defense Minister Rajnath Singh Congress China Adhir Ranjan Chaudhary)

हेही वाचा – हा तर पोस्ट-डेटेड चेक, महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत सुप्रिया सुळे साशंक

- Advertisement -

राजनाथ सिंह सभागृहात महिला आरक्षण विधेयकावर राज्यसभेत चर्चा करत होते. यावेळी त्यांनी या विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या सर्व विरोधी खासदारांचे आभार मानत चर्चा पुढे नेते होते. यादरम्यान, काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी चर्चेदरम्यान वारंवार त्यांना थांबवत होते आणि उभे एकच प्रश्न विचारत होते, तुमच्यात चीनशी चर्चा करण्याची हिंमत आहे का? राजनाथ सिंह यांनी एक-दोन वेळा त्यांचा प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर त्यांनी माझ्यात पूर्ण हिंमत आहे चीनशी चर्चा करण्याची असे म्हणत अधीर रंजन चौधरी यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र अधीर रंजन चौधरी काही शांत होण्याचे नाव घेत नव्हते.

- Advertisement -

चीनशी चर्चा केली जाईल, असे सरकारने आश्वासन दिले. पण तुम्ही तुमचे वचन पूर्ण केले नाही, असा आरोप करत अधीर रंजन चौधरी राजनाथ सिंह यांना प्रश्न करत राहिले. यानंतर इतर खासदारांनीही त्यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. चीनने भारताच्या सीमेचा किती भाग व्यापला आहे? असे प्रश्न सुरूच असल्यामुळे राजनाथ सिंह काही वेळ शांत राहिले. यानंतर ते म्हणाले की, आम्ही तुमचे ऐकले आहे, आता आमचेही थोडे ऐका, इतिहासात वाहून जाऊ नका, असा टोला राजनाथ सिंह यांनी विरोधकांना लगावला आणि म्हटले की, मी खुलेपणाने चीनशी चर्चा करण्यास तयार आहे. यावेळी सत्ताधारी पक्षातील खासदारांनी टेबलावर हात मारत विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा – मोदी सरकारचा दणका; कॅनडाच्या नागरिकांना आता भारतीय व्हिसा मिळणार नाही

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -