घरदेश-विदेशकाँग्रेस नसती तर 1984 ची दंगल आणि तंदूरची घटना घडली नसती: पंतप्रधान...

काँग्रेस नसती तर 1984 ची दंगल आणि तंदूरची घटना घडली नसती: पंतप्रधान मोदी

Subscribe

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत उत्तर देत आहेत. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर जहरी टीका केली आहे. “काँग्रेस नसती तर 1984ची दंगल आणि तंदूरची घटना घडली नसती’ असं म्हणत पंतप्रधान मोदी काँग्रेस सरकारच्या काळात घडलेल्या घटनांवरून टीकास्त्र सोडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर नाव न घेता टीका केली.

“काँग्रेस नसती तर देशात काय झाले असते”

आपल्या भाषणात तपशीलवार स्पष्टीकरण देताना पीएम मोदी म्हणाले, ‘महात्मा गांधींच्या विचारसरणीनुसार काँग्रेस नसती तर काश्मिरी पंडितांना अत्याचार सहन करावे लागले नसते. देशात लोकशाहीची हत्या झाली नसती. काँग्रेस नसती तर देशात जातिवादाची मुळे खोलवर गेली नसती. काँग्रेस नसती तर शिखांची हत्या झाली नसती. काँग्रेस नसती तर पंजाब दहशतवादाच्या आगीत जळला नसता. काँग्रेस नसती तर मुलींना तंदूरमध्ये जाळल्याच्या घटना घडल्या नसत्या. काँग्रेस नसती तर देशातील सामान्य माणसाला घर, रस्ते, वीज, पाणी, शौचालय, एवढ्या मूलभूत सुविधांसाठी एवढी प्रतीक्षा करावी लागली नसती. असा घणाघात मोदींनी केला आहे.

- Advertisement -

“देश असंवैधानिक तर पक्षाचे नाव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस का?”

पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी मोजत राहीन, काँग्रेस सत्तेत असताना त्यांनी देशाचा विकास होऊ दिला नाही, आता विरोधात असताना देशाच्या विकासात अडथळे आणत आहेत. काँग्रेसचा आता देशावर आक्षेप आहे. जर देश असंवैधानिक असेल तर तुमच्या पक्षाचे नाव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस का ठेवले गेले? असा सवाल उपस्थित करत मोदी म्हणाले की, आता ही नवीन विचारसरणी आली आहे, त्यामुळे त्यांनी नाव बदलेले. आपल्या पूर्वजांच्या चुका सुधारा. असंही मोगी म्हणाले.

“कुटुंबवादी धोरणामुळे देशाचे नुकसान झाले”

आपल्या भाषणात पंतप्रधान पुढे म्हणाले की, “काँग्रेसने परिवर्तनाची सुरुवात करावी. देशाने कुटुंबवादी धोरणाची मोठी किंमत चुकवावी लागली आहे. काँग्रेसने भारताचा पाया रचला आणि भाजपच्या लोकांनी झेंडा लावला, काही लोकांचा असा विश्वास आहे की, भारताचा जन्म 1947 मध्ये झाला, या विचारसरणीमुळे समस्या निर्माण होतात आणि ज्यांना 50 वर्षे काम करण्याची संधी मिळाली त्यांनी काहीच केले नाही. 1975 मध्ये लोकशाहीचा गळा घोटणाऱ्यांनी लोकशाहीवर बोलू नये. काँग्रेसने घराणेशाहीच्या पुढे विचार केलेला नाही, आणि हे भारताच्या लोकशाहीसाठी सर्वात मोठा धोका आहे.. एखाद्या पक्षातही जेव्हा कुटुंब सर्वोत्कृष्ट ठरते, तेव्हा सर्वात पहिला कॅजुएल्टी टॅलेंटची असते.” अशी जहीर मोदींनी केली आहे.

- Advertisement -

“काँग्रेसच्या काळात राज्य सरकारांना त्रास दिला”

पीएम मोदींनी आपल्या भाषणात सांगितले की, “जोपर्यंत दिल्ली सरकारवर काँग्रेसचे नियंत्रण होते, तोपर्यंत त्यांनी विरोधी पक्षांच्या राज्य सरकारांना प्रचंड त्रास दिला. काँग्रेसने आपल्या नेत्यांनाही सोडले नाही. क्षुल्लक गोष्टीवर सरकारे बदलली गेली. दक्षिण भारतातील पूर्वीच्या राज्य सरकारांचा उल्लेख केल्यानंतर, पंतप्रधानांनी स्वतः गुजरातमधील त्यांच्या मुख्यमंत्रिपदाचा उल्लेख केला आणि गुजरात सरकारमध्येही भेदभाव केला जात असल्याचे सांगितले. तसेच बदनामी, अस्थिरता आणि बरखास्त या मोडवर काँग्रेस काम करत होती” असे सांगितले.

पीएम मोदींनी भाषणात पुढे म्हटले की, काँग्रेस पक्षाला शहरी नक्षलवाद्यांनी हायजॅक केले आहे. ही अत्यंत चिंतेची बाब आहे. देश बदलतोय आणि इतिहास बदलला जात असल्याचं ते सांगत आहेत. आम्ही त्या लोकांना सांगू इच्छितो की फक्त एक कुटुंब म्हणजे इतिहास नाही. अशा शब्दात काँग्रेसवर टीका केली.

“मंगेशकर कुटुंबियांचा तत्कालीन गोवा सरकारने अपमान केला”

लता मंगेशकर कुटुंबियांचा तत्कालीन गोवा सरकारने अपमान केल्याचा आरोपही मोदींनी केला आहे. “लता मंगेशकर यांच्या निधनामुळे आज संपूर्ण देश दुःखी आहे. देशाची हानी झाली आहे. परंतु लता मंगेशकर यांचा परिवार गोव्याचा आहे. त्यांच्या कुटुंबाला कशी वागणूक दिली आहे. त्याबाबत देशाला माहिती दिली पाहिजे. लता मंगेशकर यांचा लहान भाऊ गोव्याच्या धरतीचे सुपुत्र त्यांना ऑल इंडिया रेडिओमधून काढण्यात आले. वीर सावरकरांनी देशभक्तीपर कविता त्यांनी आकाशवाणीवर सादर केली हा त्यांचा गुन्हा होता. त्यांना ८ दिवसांत नोकरीवरून काढून टाकण्यात आहे.” हे उदाहरण देत पंतप्रधान मोदींनी भाषण स्वातंत्र्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर दिले आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -