Maharashtra Assembly Election 2024
घरदेश-विदेशParliament Winter Session: हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेचे काम स्थगित, पंतप्रधानांची विरोधकांवर...

Parliament Winter Session: हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेचे काम स्थगित, पंतप्रधानांची विरोधकांवर टीका

Subscribe

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवार, 25 नोव्हेंबर पासून सुरुवात झाली. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद परिसरात देशाला संबोधित केले. जनतेने ज्यांना 80 वेळा नाकारले आहे असेच लोक संसदेच्या कामात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करतात, अशी टीका पंतप्रधानांनी विरोधकांवर केली.

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवार, 25 नोव्हेंबर पासून सुरुवात झाली. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद परिसरात देशाला संबोधित केले. जनतेने ज्यांना 80 वेळा नाकारले आहे असेच लोक संसदेच्या कामात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करतात, अशी टीका पंतप्रधानांनी विरोधकांवर केली. (parliament winter session 2024 lok sabha rajya manipur violence adani group pm modi)

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेचे कामकाज स्थगित करण्यात आले. विरोधी इंडि आघाडीने अदाणी मुद्द्यावर चर्चा करण्याचा आग्रह धरला. विरोधकांच्या या गोंधळामुळे दोन्ही सभागृहांची कारवाई 27 नोव्हेंबरपर्यंत स्थगित करण्यात आली.

- Advertisement -

हेही वाचा – Shivsena UBT : संख्याबळ नसतानाही विरोधी पक्षनेते पदासाठी शिवसेना उबाठा आग्रही; पण नियम काय?

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे, हे अधिवेशन 20 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद परिसरातून देशवासीयांना संबोधित केले. ज्यांना जनतेने नाकारले आहे, तीच माणसं संसदेचे कामकाज थांबवण्याचा प्रयत्न करतात. वाईट म्हणजे काही लोक आपल्या राजकीय स्वार्थासाठी थेट संसदेवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतात, असे पंतप्रधान म्हणाले. दरम्यान, हिवाळी अधिवेशनात मणिपुरातील हिंसाचार, संभलमधील हिंसाचार तसेच दिल्ली – एनसीआरमधील प्रदूषणावर चर्चा करावी, अशी कॉंग्रेसची मागणी होती.

- Advertisement -

मूठभर लोक संसदेत गोंधळ घालून संसद आपल्या ताब्यात ठेवू इच्छितात. त्यांचा हेतू संसदेचे कामकाज रोखणे एवढाच असतो. मात्र, त्यांच्या अशा कारवाया बघून जनता त्यांना नाकारते, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

आज जग भारताकडे आशेने बघतो आहे. भारताचा हाच मानसन्मान जगात आणखी वाढावा यामुळेच आपण संसदेचा उपयोग करायला हवा. मात्र, तसे घडताना दिसत नाही. त्यामुळे जनता अशा लोकांना नाकारते असेही ते म्हणाले. अशी माणसं लोकशाहीचा सन्मान करत नाहीत. काही माणसं अशी असतात, जी काम करत नाहीत आणि करूही देत नाहीत. दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांनी गोंधळ घातल्याने दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित करण्यात आले. (parliament winter session 2024 lok sabha rajya manipur violence adani group pm modi)

हेही वाचा – Waqf Board Amendment Bill : वक्फ मालमत्ता बळकावण्यासाठी…; मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे गंभीर आरोप


Edited by : Ashwini A. Bhatavdekar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -