घरदेश-विदेशParliament Winter Session : सर्व विषयांवरील चर्चेसाठी केंद्र तयार; विरोधकांना सहकार्य करण्याचे...

Parliament Winter Session : सर्व विषयांवरील चर्चेसाठी केंद्र तयार; विरोधकांना सहकार्य करण्याचे आवाहन

Subscribe

नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन 4 डिसेंबरपासून सुरू होत आहे. याचपार्श्वभूमीवर आज (2 डिसेंबर) सरकारतर्फे सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सरकारने विरोधकांना सभागृह चालवण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे आवाहन केले आहे. तसेच विरोधकांनी सभागृह चालवण्यासाठी पोषक वातावरण सुनिश्चित केल्यास सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार असल्याचेही, सरकारने स्पष्ट केले आहे. (Parliament Winter Session Center ready for discussion on all subjects Appeal to the opposition to cooperate)

मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्याच्या एक दिवस आधी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 4 डिसेंबरपासून सुरू होणारे संसदेचे हिवाळी अधिवेशन 22 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. 19 दिवस चालणाऱ्या या अधिवेशन कालावधीत सरकार 20 विधेयकांवर चर्चा करण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनात सरकार IPC, CrPC आणि पुरावा कायदा बदलण्यासाठी तीन विधेयके मंजूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे समजते.

- Advertisement -

हेही वाचा – Rajasthan Assembly Elections : मतदार राजस्थानात परंपरा कायम ठेवणार? सर्वेक्षणानुसार भाजपाची सत्ता

 यंदा होणारे संसदेचे हिवाळी अधिवेशन हे 17 व्या लोकसभेचे शेवटचे अधिवेशन असणार आहे. या कालावधीत 15 बैठका आयोजित केल्या जाणार आहेत. या अधिवेशनानंतर आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी केवळ विशेष अर्थसंकल्पीय अधिवेशन बोलावण्यात येणार आहे. विशेष अर्थसंकल्पीय अधिवेशनात नरेंद्र मोदी सरकार अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अधिवेशनात लोकसभेत तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्याविरुद्ध पैशांसाठी प्रश्न विचारल्याच्या आरोपावरून तपास अहवालावरही कारवाई होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

अधिवेशनात एकूण 15 बैठका होणार

संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, सरकार हिवाळी अधिवेशनात सर्व विषयांवर चर्चा करण्यास तयार आहे. विरोधकांनी संसदेत चर्चेसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यास मदत केली तरच ही चर्चा शक्य होईल, असे त्यांनी सर्वपक्षीय बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना म्हटले. ते म्हणाले की, संसदेचे हिवाळी अधिवेशन 4 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. अधिवेशन कालावधीत एकूण 15 बैठका होणार आहेत. आम्ही आज बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीला
या बैठकीला 23 पक्ष आणि 30 नेते उपस्थित होते.

हेही वाचा – Telangana Assembly Elections : काँग्रेस-बीआरएसमध्ये तेलंगणात होणार अटीतटीची लढत

शक्य तितकी विधेयके मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न

प्रल्हाद जोशी म्हणाले की, झिरो अवर नियमितपणे होत आहे. विधायकांकडून चर्चेसाठी चांगले वातावरण राखले जावे, अशी आम्ही विनंती केली आहे. चर्चा नियम आणि प्रक्रियांचे पालन करून झाली पाहिजे. सरकार सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार आहे. ही सर्वपक्षीय बैठक घेऊन सरकारला संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांचा कोणताही गदारोळ टाळायचा आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच संसदेने शक्य तितकी विधेयके मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. त्यासाठी विरोधकांचे सहकार्य आवश्यक आहे. हिवाळी अधिवेशन शांततेत आणि सुरळीत पार पाडण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. यावेळी विरोधक अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करू शकतात, असेही प्रल्हाद जोशी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -