घरट्रेंडिंगखवय्यांचा काही नेम नाही! इथला 'मास्क पराठा' आहे फुल्ल डिमांडमध्ये!

खवय्यांचा काही नेम नाही! इथला ‘मास्क पराठा’ आहे फुल्ल डिमांडमध्ये!

Subscribe

लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हटके आयडिया...

देशभरात कोरोनाचा कहर सुरू असून कोरोना दरम्यान एक गोष्ट आवर्जून आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे, ती म्हणजे मास्क.. आतापर्यंत तुम्ही सोन्याचं मास्क, चांदीचं मास्क बनवून घेणाऱ्या माणसांच्या बातम्या वाचल्या असतील पण, चक्क पराठ्याचा मास्क तुम्ही कधी पाहिलाय का किंवा त्याबद्दल ऐकलंय का?…

खवय्यांचे आकर्षण ठरला मास्क पराठा

कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी जगभरात विविध उपाययोजना केल्या जात आहेत, तसेच त्याबाबत जनजागृती करण्याचे विविध मार्ग आहेत. तसाच एक प्रकार तामिळनाडूमधून समोर आला असून तेथे ‘मास्क पराठे’ विकले जात आहेत. तामिळनाडूच्या मदुराई येथील एका रेस्टॉरंटमध्ये कोरोना विषाणूबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी हा अनोखा प्रयोग केला जात आहे. मास्क असलेला हा पराठा खवय्यांच्या आकर्षणाचे केंद्र बनला.

- Advertisement -

सोशल मीडियावर फोटो व्हायरल

विशेष म्हणजे या वेगळ्या प्रयोगानंतर तेथील लोकंच या मास्क पराठ्याचे कौतुक करत आहेत, तर या रेस्टॉरंटमध्ये येणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. यानंतर लोकांनी या पराठ्याचे फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट करण्यास सुरुवात केली आहे.  या हटके मास्कचे फोटो सोशल मीडियावर बरेच शेअर केले जात असून सध्या ते फोटो व्हायरल होत आहेत. वृत्तसंस्था एएनआयनेही याचे फोटो पोस्ट केले आहेत.

- Advertisement -

या रेस्टॉरंटच्या मॅनेजरने सांगितले की आम्ही पाहिले की मादुराईतील लोकांना मास्क घालायला फारसा रस नाही, म्हणून आम्ही निर्णय घेतला की लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ही पद्धत अवलंबली पाहिजे. जेणे करून नागरिकांमध्ये जनजागृती होईल आणि लोकं कोरोनाचे गांभिर्य लक्षात घेतील.


Online ऑर्डर केलं सोनं! उघडून पाहिलं आणि निघालं…
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -