घरदेश-विदेशपारशी पद्धतीने कोरोना बाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास सुप्रीम कोर्टाची बंदी

पारशी पद्धतीने कोरोना बाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास सुप्रीम कोर्टाची बंदी

Subscribe

पारंपारिक पारशी लोक म्हणतात की, ज्यांना मृतदेह जाळून अंतिम संस्कार करायचे आहेत त्यांनी ते करावे, परंतु धार्मिक दृष्टिकोनातून ते पूर्णपणे अवैध आणि चुकीचे आहे. मात्र, गेल्या काही काळापासून गिधाडांच्या कमतरतेमुळे पारशींना त्यांच्या प्रथेनुसार अंत्यसंस्कार करणे कठीण होऊ लागले आहे.

पारशी पद्धतीने मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने टॉवर ऑफ सायलेन्सला तात्पुरती स्थगिती दिली आहे. यात पारशी धर्माच्या प्रथेनुसार अंत्यसंस्कार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. कोरोनामुळे प्राण गमावलेल्या कुटुंबातील सदस्यांचे अंतिम संस्कार पारशी धर्माच्या पद्धतीने करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी पारशी समाजातील लोक अनेक दिवसांपासून करत आहेत. कारण पारशी धर्मात मृतदेहाचे दफन किंवा अंत्यसंस्कार केले जात नाही. मात्र केंद्राने अंत्यसंस्कारासाठी जारी केलेल्या एसओपीमध्ये बदल करण्यास नकार देत सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. या प्रतिज्ञा पत्रात असे म्हटले आहे की, कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाल्यास अंत्यसंस्काराचे काम रुग्णालयातील संबंधित लोकं करतात. त्यामुळे हे मृतदेह अशा प्रकारे उघड्यावर ठेवता येत नाही.

केंद्र सरकारचे प्रतिज्ञापत्र

सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात सरकारने म्हटले आहे की, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांच्या मृतदेहांचे योग्यप्रकारे दहन करणे किंवा जाळणे गरजेचे आहे. असे न केल्यास कोरोनाबाधित रुग्णांचे मृतदेह पर्यावरण, मांसाहारी प्राणी आणि पक्ष्यांच्या संपर्कात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनाबाधित मृतदेह दफन किंवा न जाळता उघड्यावर आकाशाखाली (उघड) ठेवणे ही स्वीकार्य पद्धत नाही.

- Advertisement -

पारशी लोकांच्या अंत्यसंस्काराची पद्धत कशी आहे ?

हिंदू आणि शीख धर्मात मृतदेह जाळत अंत्यसंस्कार केले जातात, त्याचप्रमाणे इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मातील लोक मृतदेहाचे दफन करतात, तर पारशी धर्मात मृतदेह आकाशाखाली उघड्यावर सोडले जातात. याला ‘टॉवर ऑफ सायलेन्स’ याला दख्मा म्हणूनही ओळखले जाते. हे मृतदेह उघड्यावर सोडले जातात.

गेल्या सुमारे तीन हजार वर्षांपासून पारशी धर्माचे लोक दोखमेनाशिनी या नावाने अंत्यसंस्कार करण्याची परंपरा पाळत आहेत.भारतातील बहुतेक पारशी लोक महाराष्ट्रातील मुंबई शहरात राहतात, जे टॉवर ऑफ सायलेन्स येथे त्यांच्या नातेवाईकांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करतात. टॉवर ऑफ सायलेन्स ही एक प्रकारची गोलाकार रचना आहे, ज्याच्या वर मृतदेह ठेवला जातो, त्यानंतर गिधाडे येऊन त्या मृतदेहाचा स्वीकार करतात. परंपरावादी पारसी अजूनही दोखमेनाशिनी व्यतिरिक्त कोणतीही पद्धत स्वीकारण्यास नकार देतात.

- Advertisement -

पारशी हा भारतातील समृद्ध समुदायांपैकी एक समुदाय आहे. पारसी अहुरमज्दा देवावर विश्वास ठेवतात. या पारशी धर्मात पृथ्वी, पाणी आणि अग्नि या घटकांना अतिशय पवित्र मानले जाते. शरीराला जाळून अग्नि तत्व अपवित्र होते अशी त्यांची धारणा आहे.पारशी लोक मृतदेह पुरत देखील नाहीत. कारण त्यांचा असा विश्वास आहे की, यामुळे पृथ्वी प्रदूषित होते. तसेच पारशी लोकं मृतदेह नदीत टाकूनही अंतिम संस्कार करू शकत नाहीत कारण यामुळे पाण्याचे घटक प्रदूषित होतात असा त्यांचा समज आहे.

पारंपारिक पारशी लोक म्हणतात की, ज्यांना मृतदेह जाळून अंतिम संस्कार करायचे आहेत त्यांनी ते करावे, परंतु धार्मिक दृष्टिकोनातून ते पूर्णपणे अवैध आणि चुकीचे आहे. मात्र, गेल्या काही काळापासून गिधाडांच्या कमतरतेमुळे पारशींना त्यांच्या प्रथेनुसार अंत्यसंस्कार करणे कठीण होऊ लागले आहे.


अबुधाबी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ड्रोन हल्लात दोन भारतीयांचा मृत्यू; ‘या’ संघटनेने स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -