घरदेश-विदेशविमान प्रवाशांसाठी खूशखबर

विमान प्रवाशांसाठी खूशखबर

Subscribe

विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना केंद्र सरकारने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. बुक केल्याच्या २४ तासांच्या आत तिकीट रद्द केल्यास कॅन्सलेशन चार्ज द्यावा लागणार नाही. विमानाच्या उड्डाणास विलंब झाल्यास विमान कंपन्यांना प्रवाशांना भरपाई द्यावी लागेल, असा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयांमुळे विमान कंपन्यांच्या मनमानीला चाप बसणार आहे.

…तर द्यावा लागणार नाही कॅन्सलेशन चार्ज
केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी मंगळवारी पत्रकारांना हवाई सेवेतील प्रस्तावित नियमांविषयी माहिती दिली. याबाबत आता प्रवाशांचे मत जाणून घेतले जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रस्तावित नियमांमध्ये प्रवाशांना दिलासा देणाऱ्या अनेक महत्त्वपूर्ण नियमांचा समावेश आहे. जर विमान प्रवासाची वेळ ९६ तासांपेक्षा जास्त असेल तर सदर तिकीट बुक केल्याच्या २४ तासांच्या आत कॅन्सल केल्यास कॅन्सलेशन चार्ज द्यावा लागणार नाही, असे त्यांनी सांगितले. तसेच कॅन्सलेशन चार्ज हे बेस फेअर अधिक इंधन अधिभारापेक्षा जास्त नसावे, असेही सूचित करण्यात आले आहे.

- Advertisement -

उड्डाण रद्द झाल्यास तिकीटाची रक्कम परत द्यावी लागणार –
जर विमान कंपनीची चूक असेल तर प्रवाशांना भरपाई देणे बंधनकारक होणार असून, डिजियात्रा पडताळणीसाठी आधार कार्ड बंधनकारक नसेल. याशिवाय तिकिटांवर २४ तासांचा लॉक इन कालावधी देण्यात येणार असून, विमानाच्या उड्डाणास विलंब झाल्यास विमान कंपनीला प्रवाशांना भरपाई देणे बंधनकारक असेल. विमानाचे उड्डाण रद्द झाल्यास प्रवाशांना तिकिटाची रक्कम परत करणे किंवा त्यांना भरपाई देणे बंधनकारक असेल.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -