घरक्राइमविमानात विडी ओढणाऱ्या प्रवाशाला अटक; दिलेल्या माहितीने पोलिसही चक्रावले

विमानात विडी ओढणाऱ्या प्रवाशाला अटक; दिलेल्या माहितीने पोलिसही चक्रावले

Subscribe

मागील अनेक महिन्यांपासून सातत्याने विमान प्रवासात प्रवाशांकडून गैरप्रकार होत असल्याची माहिती समोर येत आहे. विमानात लघुशंका करणे, इतर प्रवाशांसोबत हाणामारी करणे, यासंह अनेक प्रकार विमानात घडले आहेत. अशातच आता एका 56 वर्षीय प्रवाशाने चक्क विमानाच विढी ओढल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी संबंधित प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.

मागील अनेक महिन्यांपासून सातत्याने विमान प्रवासात प्रवाशांकडून गैरप्रकार होत असल्याची माहिती समोर येत आहे. विमानात लघुशंका करणे, इतर प्रवाशांसोबत हाणामारी करणे, यासंह अनेक प्रकार विमानात घडले आहेत. अशातच आता एका 56 वर्षीय प्रवाशाने चक्क विमानाच विढी ओढल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी संबंधित प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. मात्र या प्रवाशाच्या अटकेनंतर त्याने दिलेल्या माहितीमुळे पोलीस चक्रावले आहेत. (Passenger arrested for smoking beedi on Akasa Air flight first time flyer police arrested)

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादहून बंगळुरूला जाणाऱ्या अकासा एअरच्या विमानात बसलेल्या ५६ वर्षीय प्रवाशाला विमानात विडी ओढल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. विमान बंगळुरू विमानतळावर उतरल्यावर प्रवाशाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता त्याचे म्हणणे ऐकून पोलिसही चक्रावून गेले. ‘अनेकदा मी ट्रेननेही प्रवास करतो. त्यावेळी विडी ओढतो. म्हणून मला वाटले की, विमान प्रवासातही विडी ओढता येईल’, असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे एखाद्या विमान प्रवाशाला विडी ओढताना अटक होण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी.

- Advertisement -

नेमकं घडलं काय?

विमान प्रवासात या प्रवाशाला विडी ओढण्याची तलब आली म्हणून त्याने विमान आकाशात असतानाच विडी ओढण्यास सुरूवात केली. जेव्हा विमानात धूर दिसले तेव्हा अन्य प्रवाशांच्या पायाखालची जमिनच सरकली. त्यानंतर क्रू मेंबर्सने त्यांना थांबवले. परंतु त्यांना जुमानले नाही. म्हणून विमान बंगळुरू एअरपोर्टवर आल्यानंतर त्या प्रवाशाला पोलिसांच्या स्वाधिन केले.

- Advertisement -

दरम्यान, प्रवाशाला केम्पेगौडा इंटरनॅशनल एअरपोर्टवर विमानात विडी पिण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. एअरपोर्टवर उतरल्यानंतर विमान कंपनीच्या ड्युटी मॅनेजरनं पोलिसांत तक्रार दाखल केली. त्या प्रवाशावर अन्य प्रवाशांचा जीव जोखमीत टाकण्याच्या आरोप करण्यात आला आहे.


हेही वाचा – सरकारची पालखीतून मिरवणूक काढायची की, श्रद्धांजली व्हायची याचा निर्णय घ्या; राऊतांचा नार्वेकरांना टोला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -