घरताज्या घडामोडीरेल्वेचे तिकीट काढण्यापूर्वी; 'हे' नियम वाचा!

रेल्वेचे तिकीट काढण्यापूर्वी; ‘हे’ नियम वाचा!

Subscribe

प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बाब म्हणजे तिकिट काढण्यापूर्वी कोणत्या मार्गांवर कोणती रेल्वे धावणार आहे? कोणते नियम आहेत? हे जाणून घ्या.

भारतात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनची घोषणा केल्यापासून मागील दीड महिन्यापासून भारतातील रेल्वे सेवा बंद होती. मात्र, आता १२ मे पासून रेल्वे सेवा सुरळीत सुरु होणार आहे. ११ मे रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून ऑनलाईन पद्धतीने तिकीट बुकिंग करता येणार आहे. परंतु, प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बाब म्हणजे तिकिट काढण्यापूर्वी कोणत्या मार्गांवर कोणती रेल्वे धावणार आहे? कोणते नियम आहेत? हे जाणून घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.

‘हे’ आहेत नियम

- Advertisement -
  • ११ मे रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून ऑनलाईन पद्धतीने IRCTC च्या वेबसाईटवरून (https://www.irctc.co.in/) तिकीट बुकिंग करता येणार आहे.
  • रेल्वेचे तिकीट रेल्वे स्थानकावर किंवा प्लॅटफॉर्मवर मिळणार नाही. तिकीट घर बंद असणार आहे.
  • सुरुवातीला धावणाऱ्या १५ ट्रेनमध्ये वातानुकूलित सेवा असणार असून त्याचे भाडे सुपर फास्ट ट्रेनसारखेच असेल.
  • या ट्रेन नवी दिल्ली पासून निघणार असून आगरतळा, हावडा, पटना, बिलासपूर, डिब्रूगड, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बंगळुरू, चेन्नई, तिरुवनंतपुरम, मडगाव, मुबंई, अहमदाबाद आणि जम्मू तवी अशा मोठ्या शहरांपर्यंत जाणार आहेत.
  • केवळ आरक्षित असलेल्या प्रवाशांनाच स्थानकावर प्रवेश देण्यात येणार आहे.
  • प्रवाशांना तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.
  • रेल्वे स्टेशनमध्ये येताना त्यांना स्क्रिनिंग करुन सोडले जाईल.
  • ज्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे नसणार आहेत. अशाच व्यक्तीला ट्रेनमध्ये प्रवेश असणार आहे.
  • प्रवाशांनी गाडी सुटण्याच्या किमान एक तासाआधी रेल्वे स्थानकावर येणे बंधनकारक आहे.
  • या ट्रेनमध्ये एका डब्यात ७२ जणांची बसण्याची सोय केली जाणार असून भाड्यात कोणतीही सवलत मिळणार नाही.
  • प्रवाशांना मिळालेल्या तिकिटावर काय करावे? काय करु नये, याबात सांगण्यात आलेले असेल.
  • प्रवाशांच्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू App असणे बंधनकारक असणार आहे.
  • कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरता प्रवाशांना ट्रेनमध्ये ब्लँकेट, चादर किंवा उशी दिली जाणार नाही.
  • या ट्रेनमध्ये एसीबाबत नियम असणार आहेत. सामान्य तापमान असल्यास एसीचे तापमान वाढवण्यात येईल. मात्र, शक्यतो बाहेरील नैसर्गिक हवा घ्यावी.

    हेही वाचा – काश्मीरमध्ये लष्कराला हाय अलर्ट! जैश-ए-मोहम्मद कारवाईच्या तयारीत?


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -