घरक्राइमदिल्ली विमानतळावर प्रवाशाची उघड्यावर लघुशंका; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

दिल्ली विमानतळावर प्रवाशाची उघड्यावर लघुशंका; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Subscribe

एअर इंडियाच्या विमानात महिलेच्या अंगावर लघुशंका केल्याची घटना ताजी असतानाच आता एका व्यक्तीने दिल्ली विमानतळावर उघड्यावर लघुशंका केल्याची माहिती समोर येत आहे. दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाने उघड्यावर लघवी केल्याची घटना घडली.

एअर इंडियाच्या विमानात महिलेच्या अंगावर लघुशंका केल्याची घटना ताजी असतानाच आता एका व्यक्तीने दिल्ली विमानतळावर उघड्यावर लघुशंका केल्याची माहिती समोर येत आहे. दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाने उघड्यावर लघवी केल्याची घटना घडली. त्यावेळी इतर प्रवाशांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. (passenger urinated in the open at delhi airport police arrested on the spot)

मिळालेल्या माहितीनुसार, जोहर अली खान (39) असे आरोपीचे नाव असून, हा बिहारचा रहिवासी आहे. दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर जोहर अली खान याने लघुशंका केली. ८ जानेवारी रोजी संध्याकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

- Advertisement -

विमानतळावरील गेट क्रमांक 6 जवळ व्यक्तीने लघुशंका केला. त्यावेळी तो दारुच्या नशेत होता. याबाबत इतर प्रवाशांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर दिल्ली पोलीस आणि सीआयएसएफच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत जोहर अली खानला अटक केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम 294 आणि 510 अंतर्गत एफआयआर नोंदवून जोहरला अटक केली.

दरम्यान, जोहर अली खान दिल्लीहून सौदी अरेबियातील दम्मामला विमान पकडण्यासाठी आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा तेथून जाणाऱ्या प्रवाशांनी उघड्यावर लघुशंका करण्यास नकार दिला तेव्हा जोहरने सर्वांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. पोलिसांनी जोहरचे मेडिकल केले आणि त्यानंतर जोहरला अटक केली. मात्र जामीनपात्र कलमामुळे जोहरला जामीन मिळाला आहे.

- Advertisement -

विमानाच्या बिझनेस क्लासमध्ये 70 वर्षीय वृद्ध महिलेवर लघुशंका

याआधी न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात 26 नोव्हेंबरला दारुच्या नशेत असलेल्या एका प्रवाशाने विमानाच्या बिझनेस क्लासमध्ये 70 वर्षीय वृद्ध महिलेवर लघुशंका केली. या प्रकरणाची दखल टाटा समुहाने घेत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर आता दिल्ली पोलिसांनी शनिवारी (7 जानेवारी) आरोपी शंकर मिश्राला (34) बंगळुरू येथून अटक केली. त्यानंतर त्याला दिल्लीला आणण्यात आले.


हेही वाचा – बीडमध्ये पीक विम्याची रक्कम रखडली, पंकजा मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे धाव

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -