Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी भारतीय बनावटीच्या गाड्यांची परदेशात मोठ्या प्रमाणात विक्री; 'या' कंपनीने मारली बाजी

भारतीय बनावटीच्या गाड्यांची परदेशात मोठ्या प्रमाणात विक्री; ‘या’ कंपनीने मारली बाजी

Subscribe

भारतीय बनावटीच्या गाड्यांची परदेशात मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याची माहिती समोर येत आहे. अनेक कार उत्पादक कंपन्यांनी भारतात बनवलेल्या गाड्यांची मोठ्या प्रमाणात निर्यात केली आहे.

भारतीय बनावटीच्या गाड्यांची परदेशात मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याची माहिती समोर येत आहे. अनेक कार उत्पादक कंपन्यांनी भारतात बनवलेल्या गाड्यांची मोठ्या प्रमाणात निर्यात केली आहे. नुकताच सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सने (सियाम) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतात गाड्यांची निर्यात वाढली आहे. भारतातील गाड्यांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढत आहे. (passenger vehicle exports data of fy23 maruti suzuki india leading the segment vvp96)

काय सांगते आकडेवारी?

- Advertisement -

गतवर्षीच्या यंदा 2023 या आर्थिक वर्षात गाड्यांच्या निर्याचीच वाढ झाल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. या अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये एकूण प्रवासी वाहन (PV) निर्यात 6,62,891 युनिट्स आहे. तर 2021-22 या आर्थिक वर्षात ती केवळ 5,77,875 युनिट्स होती.

सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सने (सियाम) सादर केलेल्या आकडेवारीनुसार प्रवासी कार शिपमेंट 10 टक्क्यांनी वाढून 4,13,787 युनिट्सवर पोहोचली. तर युटिलिटी वाहनांची निर्यात 23 टक्क्यांनी वाढून 2,47,493 युनिट्सवर पोहोचली. गेल्या वर्षीच्या तुलनेत व्हॅनची निर्यात 2021-22 या आर्थिक वर्षातील 1,853 युनिट्सवरून 1,611 युनिट्सवर आली आहे.

- Advertisement -

कंपन्यांचा डेटा

सर्व कंपन्यांचे आकडे स्वतंत्रपणे पाहिले तर मारुती कंपनीने गेल्या आर्थिक वर्षात २,५५,४३९ मोटारींची निर्यात केली, तर ह्युंदाईने १,५३,०१९ मोटारींची निर्यात केली. त्याचप्रमाणे, किया इंडियाने 85,756 युनिट्स तर निसान मोटर इंडियाने 60,637 युनिट्स विदेशात पाठवले. फोक्सवॅगन इंडियाने 27,137 युनिट्स आणि होंडा कार्स इंडियाने 22,710 युनिट्सची निर्यात केली, तर महिंद्रा अँड महिंद्राने 10,622 युनिट्स विदेशात पाठवली.

पहिल्या क्रमांकावर मारुती सुझुकी

उद्योग संस्था सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सच्या ताज्या आकडेवारीनुसार, 2023 आर्थिक वर्षात भारतातून प्रवासी वाहनांची निर्यात 15 टक्क्यांनी वाढणार आहे. त्याचवेळी, देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडियाने देशातून 2.5 लाखांहून अधिक युनिट्सची निर्यात केली आहे. दुसरीकडे, निर्यातीच्या बाबतीत, Hyundai Motor India दुसऱ्या स्थानावर आणि Kia India तिसऱ्या स्थानावर आहे.


हेही वाचा – अतिक-अशरफ हत्या : सूत्रधाराचे नाव मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचेल; अतिकच्या वकिलाचा दावा

- Advertisment -