घरदेश-विदेशGo First Airlineने उड्डाणे रद्द केल्याचा फटका प्रवाशांना, अन्य पर्यायही उपलब्ध नाहीत

Go First Airlineने उड्डाणे रद्द केल्याचा फटका प्रवाशांना, अन्य पर्यायही उपलब्ध नाहीत

Subscribe

नवी दिल्ली : आर्थिक अडचणीमुळे गो-फर्स्ट एअरलाइनने 3, 4 आणि 5 मे या तीन दिवसांचे बुकिंग बंद केले आहे. (Go First Airlines grounded its flights for 3rd, 4th and 5th May amid bankruptcy) गो फर्स्टची विमानसेवा अचानक रद्द करण्यात आल्याने प्रवाशांच्या अडचणी वाढल्या आहेत. तिकीट काढलेल्या प्रवाशांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. बुकिंगचे पैसे परत मिळवण्यासाठी तसेच आपल्या फ्लाइट्सची माहिती घेण्यासाठी लोक इथे-तिथे फेऱ्या मारत आहेत. परंतु त्यांना कोणीही योग्य माहिती देत ​​नाही. त्यांना इतर कोणत्याही विमानाने प्रवास करण्याचा पर्यायही दिला जात नाही. त्यामुळे सर्वच जण हैराण झाले आहेत.

- Advertisement -

गो-फर्स्ट एअरलाइन्सचे (GoFirst Airline) तिकीट काढलेल्या हरेंद्र सिंग या प्रवाशाने माध्यमांशी बोलताना संताप व्यक्त केला. मला अहमदाबादला जायचे होते, सकाळी 6:10 वाजता फ्लाइट होते आणि त्यासाठी मी पहाटे 3 वाजता मेरठहून निघालो होतो. येथे आल्यानंतर मला कळले की, फ्लाइट रद्द झाले आहे. येथे कोणी काही सांगायलाही तयार नाही. अशा परिस्थितीत आम्ही काय करायचे? असा सवाल हरेंद्र सिंग यांनी केला. पत्रकारांनी हरेंद्रला तुमचे पैसे कधी मिळणार आहेत, असे विचारले असता, याबाबत कोणीही समाधानकारक उत्तर देत नसल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व प्रकारामुळे माझी सर्व महत्वाची कामे खोळंबली आहेत. आता मी घरी परत जात असल्याचे त्यांनी उद्विग्नपणे सांगितले.

अन्य एका प्रवाशाने सांगितले की, तो खूप दिवसांपासून लेहला जायचा योजना आखत होता. आता आज जाण्यासाठी निघालो तर, फ्लाइटच रद्द करण्यात आली आहे. तुम्ही पूर्ण परतावा घ्या, असे आपल्याला सांगण्यात आले. पण लेहहून येण्यासाठी मी स्पाईसजेटची फ्लाइट बुक केली होती, आता ते रद्द करायला गेलो तर, ते सांगतात की, आमची यात कोणतीही चूक नसल्याने संपूर्ण पेनल्टी कापून घेऊ, असे या प्रवाशाने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -