घरदेश-विदेशबसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना कारने चिरडले, सात जणांचा मृत्यू

बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना कारने चिरडले, सात जणांचा मृत्यू

Subscribe

टेक्सासमधील सिटी बस स्टॉप येथे बसची वाट पाहणाऱ्या लोकांना कारने चिरडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत.

अमेरिकेतील टेक्सासमध्ये एक भीषण रस्ता अपघात झाला आहे. ब्राउन्सविलेच्या वॉकी सीमावर्ती शहरामध्ये स्थलांतरित आश्रयस्थानाच्या बाहेर सिटी बस स्टॉपवर थांबलेल्या प्रवाशांनी चिरडल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका वाहनाने बस स्टॉपवर उभ्या असलेल्या प्रवाशांना धडक दिली. ज्यानंतर या दुर्दैवी अपघातात सात लोकांचा मृत्यू झाला आणि सहा जण जखमी झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे. हा अपघात अमेरिकेच्या वेळेनुसार सकाळी 8.30 च्या सुमारास झाला. (Passengers waiting for bus crushed by car, seven killed)

एसयूव्ही कारने दिली धडक
ब्राउन्सविले पोलीस अधिकारी मार्टिन सँडोव्हल यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात अमेरिकेच्या वेळेनुसार सकाळी 8.30 च्या सुमारास झाला. आश्रयस्थान बिशप एनरिक सॅन पेड्रो ओझानम सेंटरचे संचालक व्हिक्टर माल्डोनाडो म्हणाले की, अपघाताबाबत कॉल आल्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही तपासले, ज्यामध्ये एक एसयूव्ही कार लोकांना चिरडत असल्याचे दिसून आले.

- Advertisement -

अपघातात व्हेनेझुएलाच्या नागरिकांचा सर्वाधिक मृत्यू
ब्राउन्सविलेच्या वॉकी सीमावर्ती शहरामध्ये स्थलांतरित आश्रयस्थानाच्या बाहेर सिटी बस स्टॉप हे रस्त्याच्या पलीकडे आहे. परंतु याबाबतची कोणतीही खून(चिन्ह) याठिकाणी नाही, त्यामुळे हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. तर या अपघाताची माहिती देताना माल्डोनाडो म्हणाले की, बस स्टॉपवर प्रवाशांना बसण्याची कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे तिथे बसची वाट पाहणारे लोक शेजारी उभे होते. तसेच, या अपघातात सर्वाधिक मृत्यू हा व्हेनेझुएलाचे पुरुषांचा झाला आहे. तर या भीषण अपघातानंतर कार चालकाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

या अपघातात वाहनाने लोकांना मारलेली धडक इतकी भीषण होती की, एसयूव्हीने धडक दिल्यानंतर प्रवासी हे 100 फुट उंच उडाले. ब्राउन्सव्हिलमधील ओझानम निवारा हे एकमेव निवारा आहे जे रात्रभर उघडे असते आणि हजारो स्थलांतरितांना कोठडीतून सोडवण्याचे काम या निवाऱ्याच्या या निवारा संस्थेच्या अंतर्गत करण्यात येते.

- Advertisement -

दरम्यान, पोलिसांनी चालकाची ओळख सांगण्यात आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार हा चालक हिस्पॅनिक होता. हा अपघात मुद्दामहून घडवून आणला की चुकून झाला, याबाबतचा तपास पोलिस अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. तर कार चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा धक्कादायक अपघात घडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींकडून देण्यात आलेली आहे. या प्रकरणी कार चालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -