Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश तुझ्या मुलीसोबत पठाण चित्रपट बघून दाखव; 'या' नेत्याचे शाहरुखला चॅलेंज

तुझ्या मुलीसोबत पठाण चित्रपट बघून दाखव; ‘या’ नेत्याचे शाहरुखला चॅलेंज

Subscribe

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण स्टारर पठाण या चित्रपटातील बेशरम रंग हे पहिलं गाणं रिलीज झाल्यापासून मोठ्या वादात अडकले आहे. चित्रपटावरून सध्या जोरात राजकारण केले जात आहे. मध्य प्रदेशातील नेते ‘पठाण’ला जोरदार विरोध करत आहेत. नरोत्तम मिश्रा यांच्यानंतर आता मध्य प्रदेश विधानसभा अध्यक्ष गिरीश गौतम यांनी पठाण चित्रपटाला विरोध केला आहे. नुसताच विरोधच केला नाही तर किंग खानला एक चॅलेंजही दिले आहे.

मध्य प्रदेश विधानसभेचे सभापती गिरीश गौतम यांनी शाहरुख खानला आपल्या मुलीसोबत पठाण हा चित्रपट पाहावा, असे चॅलेंज दिले आहेत. गिरीश गौतम म्हणाले की, मी तुम्हाला प्रेषित मोहम्मद पैगंबरांवर असाच चित्रपट बनवून चालवण्याचे आव्हान देतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली संपूर्ण देशात आणि जगात रक्तपात होईल. कॅनडात पैगंबरांसोबत असे काही घडले हे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. अख्खी मुंबई जाळली पण मी त्याला अनुकूल नाही. 100 कोटींचे नुकसान झाले, आता सनातनी जागरुकता आली आहे.

शाहरुखला दिले चॅलेंज

- Advertisement -

मी शाहरुख खानला सांगतो की, तुझी मुलगी 23-24 वर्षांची झाली आहे, तिच्यासोबत बसून पठाण चित्रपट पाहून दाखव. मग सांगा की, मी माझ्या मुलीसोबत हा चित्रपट पाहत आहे. पिवळे कपडे हे राष्ट्राचे अभिमानाचे प्रतिक आहे, हिंदू धर्माशी निगडित पिवळे कपडे बेशर्म का? हिरव्याचा आदर करावा, पिवळ्याचा अपमान करावा, हे योग्य नाही. एवढेच असेल तर तुमच्या मुलीसोबत हा चित्रपट पहा. मग त्यात काही गैर नाही हे आम्ही मान्य करतो.

हिंदू धर्मावर हल्ला झाला, तर सर्व बाजूंनी फुटीरतावादी उभे राहतात. पण त्यांच्या धर्मावर हल्ला झाला, तर शिरच्छेदाचा नारा देणाऱ्यांच्या विरोधात ते का बोलत नाहीत? जो कोणी प्रेषित मोहम्मद पैगंबरांना विरोध करेल, त्याचे शिर कापले जाईल अशा धमक्या देतात. आमच्या देवाला शिव्या दिल्या जातात त्याचं काय? अस म्हणत मध्य प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष गिरीश गौतम यांनी पठाण चित्रपटाला विरोध करत त्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

पठाण हा चित्रपट पुढील वर्षी 25 जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. यामध्ये शाहरुखसोबत दीपिका पदुकोण दिसणार आहे. या चित्रपटात जॉन अब्राहमही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. पठाणचे बेशरम रंग हे गाणे रिलीज होताच ट्रेंड होत आहे. शाहरुख खान पठाणमधून 4 वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर परतताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.


‘पठाण’मधील शाहरुखचा लुक इतक्या लाखांचा

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -