घरदेश-विदेशगँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला मोठा झटका; न्यायालयाने सुनावली 4 दिवसांची पोलीस कोठडी

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला मोठा झटका; न्यायालयाने सुनावली 4 दिवसांची पोलीस कोठडी

Subscribe

गेल्या सुनावणीत दिल्ली पोलिसांनी दावा केला की, या टोळीतील इतर सदस्यांच्या शोधात अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली मात्र ते सापडले नाहीत.

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांडानंतर प्रसिद्धी झोतात आलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याला शस्त्रास्त्र कायदा प्रकरणात पटियाला हाऊस कोर्टाने मोठा झटका दिला आहे. पंजाब आर्म्स अॅक्टच्या एका जुन्या प्रकरणात दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. लॉरेन्स बिश्नोईला आज न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी दिल्ली पोलीसांच्या दक्षिण रेंज स्पेशल सेलने बिश्नोईची चार दिवसांच्या कोठडीची मागणी केली. यावेळी सुनावणीदरम्यान पोलिसांनी बिश्नोईची 20 मिनिटे चौकशी आणि त्याला पोलीस कोठडी सुनावली. (Gangster Lawrence Bishnoi)

पोलिसांच्या माहितीनुसार, पंजाबमधील एका प्रकरणात गँगस्टर जग्गू भगवानपुरिया अटक करण्यात आली आहे. यावेळी गँगस्टर जग्गू पोलिसांना सांगितले होते की, लॉरेन्स बिश्नोईने त्याला गुन्हा करण्यासाठी शस्त्रे दिली होती. भगवानपुरिया सध्या तुरुंगात आहेत. याप्रकरणी दिल्ली पोलिसांना बिश्नोईची चौकशी करायची आहे. याआधी दिल्ली पोलिसांच्या मागणीवरून पटियाला हाऊस कोर्टाने लॉरेन्स बिश्नोईच्या पोलीस कोठडीत 5 दिवसांची वाढ केली होती. शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी बिश्नोईची अधिक चौकशी करण्याची गरज असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली. (patiala house court sends lawrence bishnoi to 4 days police custody in arms)

- Advertisement -

गेल्या सुनावणीत दिल्ली पोलिसांनी दावा केला की, या टोळीतील इतर सदस्यांच्या शोधात अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली मात्र ते सापडले नाहीत. सध्या इतर राज्यांमध्ये रेड टाकली जातेय. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने न्यायालयाला सांगितले की, शस्त्रास्त्र कायद्याप्रकरणी चौकशीत तीन नावे समोर आली आहेत, त्यांचा शोध घ्यावा लागेल. यात सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस बिश्नोईला पंजाबला घेऊन जाऊ शकत नाहीत. जो पंजाबशी संबंधित माहिती देत आहे तिच माहिती पंजाब पोलिसांशी शेअर केला जात आहे आणि तपास केला जात आहे.


कोण आहेत नुपूर शर्मा? ज्यांच्या एका वक्तव्यामुळे आखाती देशांनी पुकारला भारताविरोधात एल्गार

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -