घरCORONA UPDATEBlack Fungusमधून बऱ्या झालेल्या रुग्णांना होतो 'हा' दुर्मिळ आजार, सडतात तोंडाची हाडे

Black Fungusमधून बऱ्या झालेल्या रुग्णांना होतो ‘हा’ दुर्मिळ आजार, सडतात तोंडाची हाडे

Subscribe

मध्य प्रदेशात अनेक जण या आजाराची शिकार

म्युकोरसायकोसिस (mucormycosis)  म्हणजेच काळ्या बुरशीच्या ( Black Fungus) आजाराने देशभर थैमान घातले आहे. देशभरात सध्या ४० हजारांहून अधिक काळ्या बुरशीचे रुग्ण आहेत. काळ्या बुरशीच्या इन्फेक्शनमुळे नाक, डोळे आणि मेंदूचे नुकसान होते. आतापर्यंत काळ्या बुरशीमुळे अनेकांचे डोळे, जबडा काढाव लागला. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत काळ्या बुरशीच्या भयंकर आजाराचा सामना करावा लागला आहे. असे असले तरी अनेक जण काळ्या बुरशीच्या आजारातून सुखरुप बरे देखील झाले आहेत.मात्र बऱ्या झालेल्या काही रुग्णांमध्ये एक नवा आजारात समोर आला आहे. काळ्या बुरशीच्या आजारातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये ऑस्टियोमोलाइटिस ( Osteomyelitis) हा दुर्मिळ आजार होत असल्याचे समोर आले आहे. (Patients who have recovered from mucormycosis Black Fungus have Osteomyelitis rare disease,rotting oral bones)  या नव्या दुर्मिळ आजारामुळे तोंडाच्या आतील वरील भाग आणि जबड्याची हाडे सडत आहेत. मध्य प्रदेशात अनेक जण या आजाराची शिकार झाले आहेत. भोपाळमधून ऑस्टियोमोलाइटिस या दुर्मिळ आजाराचे २० हून अधिक रुग्ण समोर आले आहेत. या आजारामुळे रुग्णांच्या तोंडाची हाडे खराब झाल्याने त्यांचा जबडा खराब झाला आहे.

या गंभीर आजारामुळे रुग्णाच्या तोंडाच्या आतील वरील भागातील आणि जबड्यातील रक्तपेशींमध्ये रक्ताच्या गुठळ्या होतात. त्यामुळे तोंडाच्या हाडांपर्यंत रक्तपुरवठा होऊ शकत नाही व  त्यामुळे तोंडातील हाडे सडण्यास सुरुवात होते,असे हमीदिया रुग्णालयातील डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. डॉक्टरांनी पुढे असे म्हटले आहे की, ऑस्टियोमोलाइटिस हा कोणताही नवीन आजार नाहीये. हा एक दुर्मिळ आजार असून याआधीही हा आजार होता. कोरोना काळात काळ्या बुरशीच्या रुग्णांध्ये अचानक वाढ झाल्याने ऑस्टियोमोलाइटिस या दुर्मिळ आजाराची प्रकरणे वाढू लागली आहेत.

- Advertisement -

ऑस्टियोमोलाइटिसची लक्षणे काय आहेत?

  • ऑस्टियोमोलाइटिसमुळे तोंडाच्या जबड्याच्या वरील भागात सूज येते.
  • दात अचानक हलू लागतात.
  • दातांमध्ये वेदना होण्यास सुरुवात होते.

ऑस्टियोमोलाइटिसचे परिणाम

  • ऑस्टियोमोलाइटिसमुळे रुग्णाच्या तोंडातील हाडे सडतात.
  • सडलेली हाडे ऑपरेशनच्या मदतीने काढून टाकावी लागतात.
  • तोडांचा जबडाही काढून टाकावा लागतो.
  • रुग्णाला खाण्यापिण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागतो.

हेही वाचा – Coronavirus India Update: देशातील कोरोना बधितांच्या आकड्यात आज पुन्हा घट, तर कोरोनाबळींचा आकडा ८५३ वर

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -