घरताज्या घडामोडीभाजप खासदार सुशील मोदी यांना जीवे मारण्याची धमकी; पश्चिम बंगालमधून मिळाले पत्र

भाजप खासदार सुशील मोदी यांना जीवे मारण्याची धमकी; पश्चिम बंगालमधून मिळाले पत्र

Subscribe

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप कोट्यातील राज्यसभा खासदार सुशील कुमार मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र मिळाले आहे. या पत्रात सुशील मोदींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप कोट्यातील राज्यसभा खासदार सुशील कुमार मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र मिळाले आहे. या पत्रात सुशील मोदींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. हे पत्र पश्चिम बंगालमधील भाजप खासदार राजेंद्र नगर येथील निवासस्थानी स्पीड पोस्टने पाठवण्यात आले आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वत:ला ममता बॅनर्जी यांच्या पक्ष तृणमूल काँग्रेसचा नेता असल्याचे सांगितले आहे. (patna city bihar politics bjp mp sushil modi receives death threat letter sent from west bengal)

मिळालेल्या माहितीनुसार, सुशील मोदी यांना मिळालेले धमकीचे पत्र पश्चिम बंगालमधील वर्धमान येथील चंपा सोम (सोमा) यांनी स्पीड पोस्टने पाठवले आहे. ‘तुम्हाला कळवत आहे की मी तृणमूल काँग्रेसचा नेता आहे. ममता बॅनर्जी भारताच्या पुढील पंतप्रधान होऊ शकतात. ममता बॅनर्जी आणि नितीश कुमार जिंदाबाद. मी तुमची हत्या करीन” असे या पत्रात इंग्रजीमधून लिहिण्यात आले आहे.

- Advertisement -

सुशील मोदी यांनी या पत्राची आणि मिळालेल्या धमकीची माहिती पाटणा एसएसपी मानवजीत सिंह ढिल्लन यांना दिली आहे. तसेच, याप्रकरणी कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे. या प्रकरणाची दखल घेतली जात आहे. या प्रकरणी कदमकुआन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास करण्यात येणार असल्याचे एसएसपी डॉ. मानवजीत सिंह ढिल्लन यांनी सांगितले.

- Advertisement -

भाजप खासदार सुशील कुमार मोदी यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. पश्चिम बंगालच्या वर्धमानमधून जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पत्र पाठवणाऱ्याने स्वत:ला तृणमूल काँग्रेसचा नेता असल्याचे सांगितले आहे. यासोबतच माझ्यासाठी अपशब्दही वापरण्यात आले आहेत. सुशील मोदी म्हणाले की, पत्रात ममता बॅनर्जी पुढील पंतप्रधान होतील असे लिहिले आहे. तुमचा खून होईल. सुशील मोदीच्या म्हणण्यानुसार, जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीने आपला पत्ता तसेच मोबाईल नंबर दिला आहे.


हेही वाचा – कर्नाटकात बॉम्बस्फोटाचा कट उधळला; ISIS च्या 3 दहशतवाद्यांना पोलिसांकडून अटक

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -