घरदेश-विदेशसातशे रुपयांचा LPG सिलेंडर विकत घ्या दोनशे रुपयांत; अशी मिळवा ऑफर

सातशे रुपयांचा LPG सिलेंडर विकत घ्या दोनशे रुपयांत; अशी मिळवा ऑफर

Subscribe

देशभरात शहरापासून खेड्यांपर्यंत घरगुती गॅस सिलेंडरचा वापर केला जातो. मात्र, गॅस सिलेंडरच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. अलिकडेच सरकारने पुन्हा एकदा सिलेंडरच्या किंमती वाढवल्या आहेत. आता विना सबसिडीचा १४.२ किलोग्रॅम सिलेंडर ६४४ रुपयांवरुन ६९४ रुपये एवढा झाला आहे. मात्र, या महागाईच्या काळात तुम्ही सातशे रुपयांचा सिलेंडर २०० रुपयांत खरेदी करु शकता. पेटीएमवर यासंदर्भात खास ऑफर सुरु आहे.

पेटीएमने LPG सिलेंडर खरेदीवर कॅशबॅक ऑफर ठेवली आहे. LPG सिलेंडर बुकिंगवर ५०० रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळवू शकता. देशांतील अनेक ठिकाणी ७०० ते ७५० रुपये एवढी घरगुती LPG गॅस सिलेंडरची किंमत आहे. त्यामुळे पेटीएमवरुन बुकिंग करत २०० ते २५० रुपयांपर्यंत HP, Indane, Bharat Gas LPG सिलेंडर मिळवू शकता. कसी मिळवाल ऑफर जाणून घ्या.

- Advertisement -
  • Paytm वरून असं करा बुक LPG सिलेंडर
  • सर्वात आधी तुमच्या फोनमध्ये Paytm app डाऊनलोड करा
  • त्यानंतर ‘recharge and pay bills’वर क्लिक करा
  • त्यानंतर तुम्हाला भारत गॅस, एचपी गॅस किंवा इंडेन यापैकी तुमचा एलपीजी गॅस सिलेंडर प्रोव्हायडर निवडावा लागेल.
  • रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरून तुमचा LPG ID टाकावा लागेल.
  • यानंतर तुम्हाला पेमेंटचा पर्याय दिसेल.
  • पेमेंट करण्याआधी ‘FIRSTLPG’ हा प्रोमो कोड वापरावा लागेल.

कधीपर्यंत आहे ही ऑफर?

पेटीएमवरून पहिल्यांदा बुकिंग करणारे ग्राहकच ५०० रुपयांपर्यंत कॅशबॅकची ऑफर मिळवू शकतात. Paytm LPG Cylinder Booking Cashback Offer या ऑफरचा लाभ ग्राहकांना ३१ डिसेंबरपर्यंत घेता येईल. अर्थात स्वस्तात सिलेंडर मिळवण्यासाठी तुमच्याकडे केवळ २ दिवस शिल्लक आहेत.

प्रत्येक आठवड्याला सिलेंडरच्या किंमती बदलणार?

काही माध्यमांच्या वृत्तानुसार असा दावा केला जात आहे की तेल कंपन्या आता दररोज किंवा साप्ताहिक गॅस सिलेंडर्सच्या किंमती बदलण्याचा विचार करीत आहेत. मात्र, हा दावा खोटा आहे. भारत सरकारने एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्याची घोषणा केलेली नाही, असं पीआयबी फॅक्ट चेकमध्ये म्हटलं आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -