नवी दिल्ली : देशाच्या डिजिटल वित्तीय व्यवहारांच्या क्षेत्रातील अग्रणी ‘पेटीएम’च्या व्यवहारांवर प्रक्रिया करणाऱ्या ‘पेटीएम पेमेंट्स बँके’वर गेल्या आठवड्यात बुधवारी रिझर्व्ह बँकेने कारवाईचा बडगा उगारला. त्यामुळे बँकेवर येत्या २९ फेब्रुवारीपासून नवीन ठेवी स्वीकारण्यावर निर्बंध आले आहेत, तसेच अनेक प्रकारच्या सेवांसाठी नव्याने ग्राहकही तिला नोंदवता येणार नाही. रिझर्व्ह बॅंकेने केलेली ही कारवाई कोणत्या कारणाने केली ते नेमकं कारण समोर आलं नाही. (Paytm Payments Bank Why action against Paytm Payments Bank RBI’s refusal to tell the exact reason)
डिजिटल पेमेंट सोल्यूशन कंपनी पेटीएमची संस्था पेटीएम पेमेंट्स बँकेवर सुरू असलेल्या संकटादरम्यान केंद्रीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. पेटीएमवर सुरू असलेल्या तपासादरम्यान पेटीएम पेमेंट्स बँकेवर सेंट्रल बँकेच्या कारवाईबद्दल विचारले असता, आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पेटीएमचे नाव न घेता सांगितले की, जर सर्व गोष्टींचे पालन केले गेले असते, तर सेंट्रल बँक नियमन केलेली संस्था बनली नसती असे ते म्हणाले. पेटीएम समस्येच्या प्रणालीबद्दल काळजी करण्याची गरज नाही, आम्ही फक्त पेमेंट बँकेवर कारवाई केली. आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर स्वामिनाथन म्हणाले की, पेटीएम विरुद्ध उणिवा आणि अनियमिततासाठी कारवाई करण्यात आली. तर त्यांना सुधारणासाठी पुरेसा वेळ देण्यात आला होता.
हेही वाचा : Mumbai Sea Link : मुंबईत होणार आणखी एक सागरी पूल, ‘या’ मार्गावरील प्रवास होणार सुखकर
नेमकं कारण सांगण्यास टाळाटाळ
पेटीएम पेमेंट्स बँकेवर केलेल्या कारवाईने सामान्य ग्राहकांनी काळजी करण्याचे कारण नसून, केवळ बँकेकडून नियमांचे उल्लंघन आणि अनियमितता आढळल्याने हे पाऊल उचलले गेले, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गुरुवारी स्पष्ट केले. मात्र, रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेतील नेमक्या उणिवा आणि अनियमितता स्पष्ट करण्यास नकार दिला हे विशेष.
हेही वाचा : Nitesh Rane : “अभिषेक घोसाळकरांची हत्या ठाकरे गटातील अंतर्गत गँगवॉरमुळेच”, नितेश राणेंचा दावा
यामुळे करण्यात आली कारवाई
आर्थिक गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या एजन्सी ईडीने पेटीएमच्या ब्रँडखाली चालणाऱ्या कंपन्या परकीय चलन नियमांच्या उल्लंघनात गुंतल्या आहेत की, नाही हे शोधण्यासाठी वन 97 कम्युनिकेशन्सच्या विरोधात तपास सुरू केला आहे. त्याआधी गेल्या आठवड्यात, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने Paytm Payments Bank Limited ला 29 फेब्रुवारी 2024 नंतर कोणत्याही ग्राहकाच्या खात्यात ठेवी किंवा टॉप-अप, प्रीपेड इन्स्ट्रुमेंट, वॉलेट आणि फास्टॅग इत्यादी स्वीकारण्यास मनाई केली होती. सर्वसमावेशक सिस्टम ऑडिट अहवाल आणि बाह्य ऑडिटर्सच्या अनुपालन पडताळणी अहवालानंतर RBI ने पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड (PPBL) विरुद्ध हे पाऊल उचलले.