घरताज्या घडामोडीवशिलाही नको आणि पासही मागू नका, पीसीबी अध्यक्षांची ट्विटरद्वारे विनंती

वशिलाही नको आणि पासही मागू नका, पीसीबी अध्यक्षांची ट्विटरद्वारे विनंती

Subscribe

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे प्रकाशझोतात असतात. यापूर्वी रमीझ राजा यांना यासाठी ओळखले जात होते. परंतु डिसेंबरमध्ये नजम सेठी यांनी रमीझ राजांना पदच्युत करत पीबीसी चेअरमनपदावर विराजमान झाले. यावेळी नजम सेठी यांनी ट्विट करत एक विनंती केली आहे. तसेच हे ट्वीट आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

नजम सेठी यांनी ट्वीट करत मित्रांना वशिलाही नको आणि पासही मागू नका, अशी विनंती केली आहे. मी माझ्या मित्रांना आणि वरिष्ठांना जे पात्र नाहीत अशा खेळाडूंची किंवा कोचची निवड करण्यासाठी आणि नोकरी लावण्यासाठी वशिला लावू नका अशी विनंती करतो. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला जगातील सर्वोत्तम संस्थांशी स्पर्धा करायची आहे. त्यामुळे अपात्र लोकं आपल्याला परवडणार नाहीत, असं ट्वीट नजम सेठी यांनी केलं आहे.

- Advertisement -

पीसीबीचे ऑडिट करणाऱ्या संसदेच्या पब्लिक अकाऊंट कमिटीने आम्हाला अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करण्यापासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे, असंही सेठी यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

पाकिस्तान आशिया कप 2023 चे यजमान पद मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे नजम सेठी यांना जय शाह यांना भेटण्याची तीव्र इच्छा होती. कारण जय शहा यांनी गेल्या वर्षी आशिया कप त्रयस्थ ठिकाणी खेळवण्यात येण्याबाबत वक्तव्य केले होते. तसेच जय शाह हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव देखील आहेत.


हेही वाचा : कोरोना महामारी, अर्थचक्र मंदावल्याने संकट गडद; ‘इतक्या’ कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -