घरदेश-विदेशखलिस्त्यान्यांविरोधात सॅन फ्रान्सिस्कोत भारतीय-अमेरिकन नागरिकांची शांतता रॅली

खलिस्त्यान्यांविरोधात सॅन फ्रान्सिस्कोत भारतीय-अमेरिकन नागरिकांची शांतता रॅली

Subscribe

वॉशिंग्टन : सॅन फ्रान्सिस्को येथील भारतीय वाणिज्य दूतावासासमोर मोठ्या संख्येने भारतीय-अमेरिकन नागरिकांनी शांतता रॅली काढली होती. या आठवड्याच्या सुरुवातीला खलिस्तान समर्थकांनी गेल्या रविवारी सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय वाणिज्य दूतावासावर हल्ला करून नुकसान केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून नागरिकांनी ही शांतता रॅली काढली होती.

खलिस्तान समर्थकांनी गेल्या रविवारी घोषणाबाजी करत पोलिसांनी सुरक्षिततेसाठी लावलेले तात्पुरते बॅरिकेट्स तोडले आणि वाणिज्य दूतावासाच्या आवारात दोन कथित खलिस्तानी झेंडे लावले होते. मात्र, वाणिज्य दूतावासाच्या दोन कर्मचाऱ्यांनी हे झेंडे लगेचच हटवले. या घटनेच्या निषेधार्थ तसेच भारताच्या पाठीशी असल्याचे दर्शविण्यासाठी शुक्रवारी सॅन फ्रान्सिस्को आणि आसपासच्या परिसरात अनेक भारतीय-अमेरिकन नागरिकांनी तिरंगा ध्वज फडकावला.

- Advertisement -

तिरंग्यासह अमेरिकेचा ध्वजही फडकावला
भारतीय-अमेरिकन नागरिकांनी खलिस्तान समर्थकांच्या या कारवायांचा निषेध केला. यावेळी काही फुटीरतावादी शीखही तेथे उपस्थित होते. तथापि, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्थानिक पोलिसांचा मोठा बंदोबस्त तिथे तैनात होता. या फुटीरतावादी शिखांनी खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या, परंतु मोठ्या संख्येने जमलेल्या भारतीय अमेरिकन नागरिकांनी ‘वंदे मातरम’चा नारा दिला आणि अमेरिकेसह भारताचा राष्ट्रध्वज फडकावला. अलिकडच्या काही महिन्यांत कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनमध्ये खलिस्तान समर्थकांकडून भारतविरोधी कारवायांमध्ये वाढ झाली आहे. त्यांनी या देशांमधील काही हिंदू मंदिरांची तोडफोड देखील केली आहे.

- Advertisement -

खलिस्तान्यांच्या हल्ल्याचा भारताने अमेरिकेकडे निषेध नोंदवला
सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय वाणिज्य दूतावासाबाहेर खलिस्तानी समर्थकांनी केलेल्या तोडफोडीबद्दल भारताने सोमवारी दिल्लीतील अमेरिकेच्या राजदूताकडे तीव्र निषेध नोंदवला. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी अमेरिकन सरकारने योग्य उपाययोजना कराव्यात, असे या राजदूताला सांगण्यात आले. अमेरिकेत भारतीय वंशाचे सुमारे 42 लाख लोक राहतात आणि अमेरिकेतील हा तिसरा सर्वात मोठा आशियाई वांशिक गट आहे.

हेही वाचा – राहुल गांधींवर आहेत आणखी सहा गुन्हे, खटल्यांची सुनावणी कुठपर्यंत?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -