Thursday, July 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर टेक-वेक Pegasus : एका व्यक्तीवर पाळत ठेवण्यासाठी येतो ७० लाख खर्च; स्पायवेअर 'असं'...

Pegasus : एका व्यक्तीवर पाळत ठेवण्यासाठी येतो ७० लाख खर्च; स्पायवेअर ‘असं’ करतं काम

Related Story

- Advertisement -

इस्त्रायलचे पेगासस स्पायवेअर पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. पेगासस सॉफ्टवेअरचा वापर करुन पत्रकार, कार्यकर्त्यांवर नजर ठेवली जात आहे. दरम्यान, पेगासस नेमकं आहे काय? हे कसं काम करतं? या स्पायवेअरद्वारे हेरगिरी करण्यासाठी किती खर्च येतो? याबद्दल लोकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे. पेगासस इस्त्रायली हेरगिरी करणारी कंपनी एनएसओ ग्रुपने विकसत केलं आहे. हे एक स्पायवेअर आहे. म्हणजेच याचा उपयोग हेरगिरीसाठी करता येतो. हे ऑनलाइन मिळणाऱ्या रँडम स्पायवेअरसारखं नाही आहे. हे एक अतिशय प्रगत टूल आहे.

पेगासस स्पायवेअर प्रत्येकजण विकत घेऊ शकत नाही. ते फक्त सरकारबरोबर काम करतात असा कंपनीचा दावा आहे. याचा वापर मेक्सिको आणि पनामा या सरकारांकडून केला जात आहे. ही गोष्ट सार्वजनिक क्षेत्रात आहे. अहवालानुसार, यात ४० देशांमधील ६० ग्राहक आहेत. कंपनीने असं म्हटलं आहे की त्याचे वापरकर्ते ५१ टक्के इंटिलिजेंट एजन्सीचे आहेत, कायद्याची अंमलबजावणी करणारे ३८ टक्के आणि सैन्यातील ११ टक्के आहेत. कंपनीने त्यांच्या वेबसाइटवर गुन्ह्याचा तपास करण्यास मदत करतो असं लिहिलं आहे.

- Advertisement -

कंपनीच्या म्हणण्यानुसार एनएसओ केवळ पेगाससचा परवाना सार्वभौम राज्य, राज्य एजन्सींना देतात. हे पेगाससला ऑपरेट करत नाही. हे त्यांच्या वापरामध्ये व्यत्यय आणत नाही किंवा ग्राहकांची माहिती संकलित करत नाही. हे सामूहिक हेरगिरी करण्याचे तंत्रज्ञान नाही. हे विशिष्ट मोबाइल डिव्हाइसमधूनच डेटा संकलित करते.

परवाना ७० लाखांचा

एका अहवालानुसार, पेगासस स्पायवेअर परवाना स्वरूपात विकलं जातं. त्याची किंमत त्याच्या करारावर अवलंबून असते. परवान्यासाठी ७० लाखांपर्यंत खर्च करावा लागतो. एका परवान्यासह अनेक स्मार्टफोन्स ट्रॅक केले जाऊ शकतात.

- Advertisement -

अहवालात असे सांगितलं गेलं आहे की २०१६ च्या अंदाजानुसार एनएसओ समूहाने केवळ १० लोकांवर नजर ठेवण्यासाठी सुमारे ९ कोटी रुपये आकारले होते. २०१६ च्या किंमत यादीनुसार, एनएसओ ग्रुप १० डिव्हाईस हॅक करण्यासाठी आपल्या ग्राहकांकडून ६,५०,००० डॉलर (सुमारे ४.८४ कोटी रुपये) घेते. यासह, त्याच्या इंस्टॉलेशनसाठी ५,००,००० (सुमारे ३.७५ कोटी रुपये) द्यावे लागतात.

या स्पायवेअरद्वारे कोणती माहिती मिळवू शकतात?

या साधनाच्या मदतीने हल्लेखोर एसएमएस, संपर्क तपशील, कॉल इतिहास, कॅलेंडर रेकॉर्ड, ईमेल, इन्स्टंट मेसेजिंग अॅप्स आणि ब्राउझिंग हिस्ट्रिबद्दल माहिती मिळवू शकतात. एनएसओ समूहाच्या उत्पादनाच्या माहितीपत्रकानुसार, पेगासस हळूच फोटो क्लिक करू शकतो, कॉल रेकॉर्ड करू शकतो, आसपासचा आवाज रेकॉर्ड करू शकतो आणि वापरकर्त्यांच्या माहितीशिवाय स्क्रीनशॉट घेऊ शकतो.

अशा पद्धतीने मोबाईलमध्ये करतं प्रवेश

या स्पायवेअरला इंस्टॉल करण्यासाठी एका लिंकवर क्लिक करावं लागतं. लिंकवर क्लिक केल्याशिवाय हा स्पायवेअर मिस्ड कॉल किंवा व्हॉट्सअप कॉलद्वारे फोनमध्ये इंस्टॉल केला जाऊन शकतो. हे अँड्रॉइड, आयओएस, विंडोज फोन, ब्लॅकबेरी, सिम्बियन आणि तिझेन या सर्व ऑपरेटिंग सिस्टममध्ये घुसू शकतो.

 

- Advertisement -