घरदेश-विदेशहेरगिरीचं काम पंतप्रधान मोदी आणि भाजप करतंय; नाना पटोलेंचा घणाघात

हेरगिरीचं काम पंतप्रधान मोदी आणि भाजप करतंय; नाना पटोलेंचा घणाघात

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष संपूर्ण देशाची हेरगिरी करत आहेत, असा घणाघात महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. नाना पटोले यांनी आज दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पपंतप्रधान मोदी आणि भाजपवर घणाघाती टीका केली. पेगासस स्पायवेअरद्वारे फोन टॅपिंग केली जात असल्याचा दावा मीडिया संस्थांनी केल्यानंतर देशासह संसदेत पडसाद उमटत आहे.

“राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार हे पंतप्रधान मोदींना भेटले हे हा त्यांचा निर्णय आहे. त्यांचे कोणते नेते कोणाला भेटले यावर लक्ष देत नाही. हेरगिरी तर सध्या मोदी करत आहेत देशातील जनतेची…देशातील जनतेच्या गोपनीयतेला धोका पोहोचवण्याचं काम भाजप आणि मोदी करत आहेत. कोण कुठे जातं याची हेरगिरी काँग्रेस करत नाही,” असं नाना पटोले म्हणाले.

- Advertisement -

फडणवीस सरकारच्या काळात माझा फोन टॅप झाला

फडणवीस सरकारच्या काळात २०१६-१७ ला माझा स्वत:चा फोन टॅप झाला, भाजपच्या अनेक नेत्यांचे फोन टॅप झाले, पत्रकारांचे, अधिकाऱ्यांचे, राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोन टॅप झाले होते. तो विषय अधिवेशनात उपस्थित केला होता. त्याच्यासाठी याआधीच चौकशी समिती नेमली आहे आणि चौकशी सुरु आहे, असं नाना पटोले यांनी सांगितलं.

राहुल गांधींसोबत संघटनात्मक विषयांवर चर्चा

राहुल गांधींसोबत आजा नाना पटोले यांची भेट झाली. यावर देखील नाना पटोले यांनी भाष्य केलं. राहुल गांधी यांच्या सोबत संघटनात्मक विषयांवर चर्चा झाली, असं नाना पटोले यांनी सांगितलं. महाराष्ट्रामध्ये आज जी काही इतर पक्षांची स्थिती आहे, त्यामध्ये काँग्रेसची जागा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आहे. त्याला महाराष्ट्रात उभं कसं करायचं यावर चर्चा झाली.

- Advertisement -

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार

नाना पटोले यांनी पुन्हा एकदा स्वबळाची भाषा केली आहे. विधानसभा निवडणुकांना अजून वेळ आहे. पण राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार आहोत, असं नाना पटोले यांनी सांगितलं.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -