Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश महान फुटबॉलपटू पेले कालवश; ८२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

महान फुटबॉलपटू पेले कालवश; ८२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Subscribe

एडसन अरांतेस डो नासिमेंटो हे पेले यांचे पूर्ण नाव आहे. त्यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९४० रोजी ब्राझीलच्या मिनास गेराइस राज्यातील ट्रेस कोराकोस येथे झाला. कृष्णवर्णीय पेले यांच्या नावावर अनेक विश्वविक्रम आहेत. सध्याच्या दिग्गज खेळाडूंना हे विश्वविक्रम तोडता आले नाहीत.

सालो पालओः फुटबॉल क्षेत्रात विविध विश्वविक्रम करणारे महान फुटबॉलपटू पेले यांचे गुरुवारी रात्री उशिरा निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. आपल्या खेळीने २० च्या दशकात संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या पेले यांनी ब्राझिलला तीनवेळा फुटबॉल विश्वचषक जिंकून दिला आहे. १ हजार ३६३ सामने खेळल्याची पेले यांच्या नावावर नोंद आहे. त्यांनी १ हजार २८१ गोल केले आहेत. ब्राझीलसाठी ९१ सामन्यात त्यांनी ७७ गोल केले आहेत.

एडसन अरांतेस डो नासिमेंटो हे पेले यांचे पूर्ण नाव आहे. त्यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९४० रोजी ब्राझीलच्या मिनास गेराइस राज्यातील ट्रेस कोराकोस येथे झाला. कृष्णवर्णीय पेले यांच्या नावावर अनेक विश्वविक्रम आहेत. सध्याच्या दिग्गज खेळाडूंना हे विश्वविक्रम मोडता आले नाहीत. पेले यांना कर्करोग झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरु होते. सालो पाउलोच्या अलबर्ट आइन्स्टाइन रुग्णालयात ते नियमित तपासणीसाठी गेले होते. मात्र त्यांची प्रकृती खालावत गेली. अखेर गुरुवारी रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली.

- Advertisement -

सर्वाधिक कमी वयात विश्वकप चषकात पदार्पण करणारे पेले हे एकमेक खेळाडू आहेत. १९५८ साली पेले हे विश्वकप चषकाचा पहिला सामना खेळले. त्यावेळी ते १७ वर्षांचे होते. त्यावेळी क्वाॅर्टर फायनलमध्ये त्यांनी पहिला गोल मारला. पेले यांनी १९५८, १९६२ व १९७० असे तीन विश्वचषक अर्जंटीनाला जिंकून दिले. एकूण ते चार विश्वचषक खेळले. १९७१ साली त्यांनी राष्ट्रीय संघातून निवृत्ती घेतली. त्यानंतर पेले यांना कर्करोग झाला. सप्टेंबर २०२१ मध्ये त्यांच्या शरीरातील कोलोन ट्यूमर हटवण्यात आला. त्यांच्यावर केमो थेरेपी करण्यात आली. त्यांना हदयासंदर्भातही आजार होता.

पेले नावाने कायदा

- Advertisement -

ब्राझीलच्या अध्यधांनी ११९५ मध्ये पेले यांच्यासाठी क्रीडा मंत्रालयात खास पद तयार केले. फुटबॉलमधील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी पेले यांनी कायदा केला. पेले या नावाने हा कायदा ओळखला जातो. ११९४ मध्ये युनिस्कोने पेले यांची Goodwill Ambassador म्हणून नियुक्ती केली.

शंभर गोल करण्याचा विक्रम
सलग दोन वर्षे शंभर गोल करण्याचा विक्रमही पेले यांनी केला. १९५९ मध्ये १२७ तर १९६१ साली ११० गोल पेले यांनी केले.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -