घरदेश-विदेश... आणि पेले पडले भारतीय खेळाडूंच्या प्रेमात

… आणि पेले पडले भारतीय खेळाडूंच्या प्रेमात

Subscribe

भारतीय फुटबॉल संघाला अजूनही विश्वचषक सामन्यांत स्थान मिळालेले नाही. भारतीय संघाचा निवड सामन्यातच पराभव होतो. त्यामुळे आपला संघ निवड सामना खेळून माघरी फिरतो. भारताच्या पीके बॅनर्जी यांच्या मोहन बागान संघ व पेले यांच्या न्यूयाॅर्क काॅसमाॅस संघ यांच्यात एक सामना झाला होता. हा सामना मैत्रिपूर्ण होता.

नवी दिल्लीः back and white टीव्हीच्या काळात पेले यांचे जगभरात चाहते होते. त्यांच्या खेळीच्या प्रेमात संपूर्ण जग होते. मात्र भारतीय खेळाडूंच्या खेळीने पेले यांना भुरळ पाडली होती. पेले यांच्या निधनानंतर या घटनेची आठवण अनेक भारतीयांना झाली.

भारतीय फुटबॉल संघाला अजूनही विश्वचषक सामन्यांत स्थान मिळालेले नाही. भारतीय संघाचा निवड सामन्यातच पराभव होतो. त्यामुळे आपला संघ निवड सामना खेळून माघरी फिरतो. भारताच्या पीके बॅनर्जी यांच्या मोहन बागान संघ व पेले यांच्या न्यूयाॅर्क काॅसमाॅस संघ यांच्यात एक सामना झाला होता. हा सामना मैत्रिपूर्ण होता. २४ डिंसेबर १९७७ साली हा सामना झाला होता. कोलकता येथील भव्य अशा ईडन गार्डन स्टेडिअमवर हा सामना झाला होता. त्यावेळी फुटबॉल प्रेमींनी मैदानावर एकच गर्दी केली होती. फुटबॉलचा बादशाह येणार असल्याने त्याला बघण्यासाठी चाहत्यांनी स्टेडिअमच्या बाहेरही गर्दी केली होती.

- Advertisement -

पेलेच्या संघासमोर भारतीय खेळाडूंचा टिकाव लागेल का, असा प्रश्न अनेकांना पडला होता. हा सामना एकतर्फी होणार व पेले यांचाच संघ जिंकणार हे सर्वश्रुत होते. सामना सुरु झाल्यापासून संपूर्ण मैदानावर पेले यांच्याच नावाचाच घोष सुरु होता. मात्र भारतीय खेळाडूंनी पेले यांच्या संघाला अनपेक्षित अशी टक्कर दिली. एवढच काय तर या सामन्यात भारतीय संघाने पेले यांना एकही गोल करु दिला नाही.

९० मिनिटांच्या सामन्यात भारतीय संघाची कामगिरी लक्षवेधी ठरली. या सामन्यात मोहन बागानकडून श्याम थापा आणि हबीब यांनी गोल केले. तर न्यूयाॅर्क कॉसमॉस संघाने एक गोल केला. त्यानंतर एक पेनल्टीच्या जोरावर न्यूयॉर्क कॉसमॉस संघाने सामन्यात बरोबरी केली.

- Advertisement -

भारतीय फुटबॉलपटूंची ही खेळी पेले यांंना भावली. सामना संपल्यानंतर मोहन बागान संघाने पेले यांच्या सन्मानार्थ एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात पेले यांना हिऱ्याची अंगठी दिली जाणार होती. मात्र या सन्मानापेक्षा पेले हे भारतीय खेळाडूंना भेटण्यास अधिक उस्तुक होते. कार्यक्रमात पेले यांनी श्याम थापा व हबीब यांचे कौतुकही केले.

 

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -