Pension Update : पेन्शनधारकांनो 5 दिवसांत उरका ही काम; अन्यथा पेन्शन बंद होणार

venus transit in aries on 23 may 2022 positive effect on zodiac signs shukra gochar 2022
Shukra Gochar 2022 : आजपासून 27 दिवस 'या' लोकांना होणार धनलाभ! शुक्राच्या कृपेने होईल पैशांचा पाऊस

जर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला पेन्शन (Pension Update) मिळणं चालू असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण तुम्ही लवकरातं त्यासंबंधीत काम उरकला नाहीत तर तुम्हाला मिळणारे पेन्शन बंद होऊ शकते. संरक्षण मंत्रालयाने संरक्षण निवृत्तीवेतन धारकांना नियमित मासिक पेन्शन मिळवण्यासाठी पाच दिवसांत एक काम पूर्ण करण्यास सांगितलं आहे. (old pension scheme vs new pension scheme)

पेन्शनधारकांना त्यांची वार्षिक ओळख 25 मेपर्यंत पूर्ण करण्याचा मेसेज देण्यात आला आहे. त्यामुळे पेन्शनधारकांनी त्यांची वार्षित ओळख पूर्ण न केल्यास त्यांचे पेन्शन मिळणे बंद होऊ शकते.

सरकारने जारी केलेल्या नियमानुसार, आत्तापर्यंत प्राप्त माहितीनुसार, 43.774 संरक्षण निवृत्तीवेतनधारक ऑनलाइन प्रणाली SPARSH मध्ये स्थलांतरित झाले आहेत, परंतु त्यांनी अद्याप वार्षिक ओळख पूर्ण केलेली नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या संरक्षण मंत्रालयाने निवृत्ती वेतनधारकांना 25 मेपर्यंत वार्षिक ओळख अर्थात जीवन सन्मान पूर्ण करण्यास सांगितले आहे. जेणेकरून त्यांना कोणत्याही अडचणीशिवाय पेन्शन मिळू शकेल.

EPFO : आता पेन्शनबाबत नो टेन्शन, EPFOकडून नवीन उपक्रम जारी, जाणून घ्या

अद्यापही पेन्शनधारक (2016 पूर्वी निवृत्त झालेले) पेन्शनच्या जुन्या पद्धतीने पेन्शन सेवेचा लाभ घेत आहेत. मात्र अद्यापही 1.2 लाख पेन्शनधारकांनी कोणत्याही प्रकारे त्यांची वार्षिक ओळख पूर्ण केलेली नाही.

वार्षिक ओळख पूर्ण करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

मोबाईल युजर्स फेस अॅपद्वारे डिजिटल जीवन प्रमाण ऑनलाईन जीवन प्रमाण करु शकतात.

पेन्शनधारक वार्षिक ओळख पूर्ण करण्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) ला भेट देऊ शकतात.

तुम्ही तुमच्या क्षेत्राजवळील CSC https://findmycsc.nic.in/ येथेही शोध घेऊ शकता.

निवृत्तीवेतनधारक जीवन प्रमाण अद्यतनित करण्यासाठी त्यांच्या जवळच्या DPDO ला देखील भेट देऊ शकतात.

जुने पेन्शनधारक जीवन प्रमाण अद्ययावत करण्यासाठी त्यांच्या बँकेशी संपर्क साधू शकतात.


केंद्रानंतर राज्याचाही दिलासा, पेट्रोल 2.8 पैशांनी तर डिझेल 1.44 पैशांनी स्वस्त