घरदेश-विदेशसाध्वी, जनतेचा शाप तुला लागणार, अन् तू हरणार !

साध्वी, जनतेचा शाप तुला लागणार, अन् तू हरणार !

Subscribe

हेमंत करकरे यांनी माझ्यासोबत चूकीचा व्यवहार केला आणि मला याप्रकरणात अडकवले. ते देशद्रोही, कुटिल आणि धर्मविरोधी होते अशी वादग्रस्त टीका साध्वींनी केली.

मालेगाव बॉम्बस्फोटातील मुख्य संशयित आणि भाजपच्या उमेदवारी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी मुंबई दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या हेमंत करकरे यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर आता जोरदार टीका होऊ लागली आहे. विरोधी पक्ष नेते त्याचसोबत सोशल मीडियावर जवळपास १८ हजारापेक्षा अधिक लोकांना साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याविरोधात टीका केली आहे.

काय म्हणाल्या होत्या साध्वी

‘हेमंत करकरे आपल्या कर्मामुळेचे मारले गेले असून त्यांनी मला खोट्या केसमध्ये अडकवले. त्यांना याची शिक्षा मिळाली असल्याचे वक्तव्य साध्वींनी केले होते. दहशतवाद्यांनी करकरे यांना मारुन माझे सुतक संपवले असल्याचे धक्कादायक वक्तव्य त्यांनी केले आहे. हेमंत करकरे यांनी माझ्यासोबत चूकीचा व्यवहार केला आणि मला याप्रकरणात अडकवले. ते देशद्रोही, कुटिल आणि धर्मविरोधी होते अशी वादग्रस्त टीका साध्वींनी केली.

- Advertisement -

साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या वक्तव्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टीका केली आहे. भाजपच्या भोपाळ लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार प्रज्ञा सिहं ठाकूर यांनी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या करकरेंविरोधात अतिशय निंदनिय वक्तव्य केले आहे. भाजपने त्यांचे अरे रुप दाखवून दिले असून ते जगासमोर आले पाहिजे असे केजरीवाल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

काँग्रेसचे भोपाळचे उमेदवार दिग्विजय सिंह यांनी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी असे सांगितले आहे की, निवडणूक आयोगाने आधीच स्पष्टीकरण दिले आहे की, सेना आणि शहीद जवानांविरोधात काहीच वक्तव्य केले जाऊ नये. हेमंत करकरे ही एक प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी होते. ज्यांनी मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसने देखील साध्वी प्रज्ञा सिहं ठाकूर यांच्यावर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने ट्विट केले असून यामध्ये असे म्हटले आहे की, ‘या निमित्ताने भाजपाचा दहशतवादी चेहरा समोर आला. प्रज्ञा सिंह यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याविरोधात अपमानास्पद वक्तव्य केले. एका बाजूला शहिदांच्या नावे मतं मागायची व दुसऱ्या बाजूने देशरक्षणासाठी प्राणांची आहुती दिलेल्या शहिदांचा अपमान करायचा अशी भाजपाची नीती आहे.’

दरम्यान, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या वक्तव्यावर नेटकरी संतप्त झाले आहेत. हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारी साध्वी दहशतवादी असल्याची टीका केली जात आहे. भाजपने तिला लोकसभेचे तिकीट दिले आहे. तुला आमच्या सगळ्यांचा शाप आहे तू हरणार असून जनता तुला तुझी लायकी दाखवणार असल्याची नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -