घरदेश-विदेशसोशल मीडियावरील खोट्या माहितीमुळे लोकं मरत आहे, जो बायडन यांची संतप्त प्रतिक्रिया

सोशल मीडियावरील खोट्या माहितीमुळे लोकं मरत आहे, जो बायडन यांची संतप्त प्रतिक्रिया

Subscribe

जगभरामध्ये डिजीटल युगाचे जाळे पसरलं असून. या नेटवर्कींगमुळे कुठे,काय,कधी घडत आहे याची इंत्यभूत माहिती वेळोवेळी मिळते. इतकचं नाही तर शिक्षण,बिजनेस हे सुद्धा ऑनलाईन झाल्याने एखाद्या व्यक्तीला आता घराबाहेर पडण्याची गरज देखील भासत नाही. अशातच जगभरामध्ये पसरलेल्या या नेटवर्कींगमुळे चुकीच्या माहितीच्या आधारे अनेकांना नाहक त्रासाला देखील सामोरे जावे लागते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायजन यांनी नुकतच एका सोशल नेटवर्कींग कंपन्यामुळे माणसाना जीव गमवावा लागत असल्याचे वक्तव्य केलं आहे. कोरोना लसीकरणा संदर्भातील एका सभेतील भाषणात जो बायडन यांनी सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवल्याने अनेक माणसं मरत असल्याचे आरोप केले आहेत. अमेरिकेतील पसिद्ध डॉक्टर विवेक मुर्ती यांनी म्हंटलं होतं की खोटी माहिती लसीकरण मोहिमेसाठी घातक ठरु शकते यानंतर जो बायडन यांनी देखील मुर्ती यांना समर्थन देत आपले मत मांडलं.

- Advertisement -

तसेच एका पत्रकार परिषदेदरम्यान  फेसबूक सारख्या सोशल नेटवर्कींग साईटचा वापर खोटी माहिती पसरवण्याकरीता  करण्यात येतो त्याबद्दल तुमचं मत काय आहे असं जो बायडन यांना विचारण्यात आलं होतं. या वर उत्तर देत, “ते लोकांना मारत आहेत, असं वक्तव्यं केलं होतं. तसेच सध्या ज्या लोकांचे लसीकरण झाले नाहीये त्याना साथीचा आजार झाल्याची माहिती जो बायडन यांनी दिली होती.


हे हि वाचा – WorldEmojiDay: इंटरनेटवर सर्वाधिक वापरला जाणारा इमोजी कोणता,जाणून घ्या इमोजीचा रंजक इतिहास

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -