घरताज्या घडामोडीCorona: कोरोनानंतर लोकांना त्वचेसह होतोय नखांचा आजार; 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Corona: कोरोनानंतर लोकांना त्वचेसह होतोय नखांचा आजार; ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Subscribe

जरी कोरोनातून मुक्त झाले तरी अनेकांना वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागत आहे. यापूर्वी आपण पाहिले की, अनेक जण म्युकरमायकोसिस (काळी बुरशी) सारख्या बुरशीजन्य आजाराला बळी पडले. मग यानंतर पांढरी बुरशी, पिवळी बुरशी असे आजार आले. पण आता कोरोनामुक्त झाल्यानंतर हेच आजार होत नसून त्वचा, केस आणि नखांसंबधीत आजारांना सामोर जावे लागत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तज्ज्ञांनी काळजी घेण्यासाठी आणि वाढत्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला दिला आहे.

दिल्ली, मुंबई आणि काही प्रमुख शहरांतील डॉक्टरांनी सांगितले की, ‘रुग्णालयातून डिस्चार्ज झालेल्या किंवा घरात बसून ठीक झालेल्या अनेक रुग्णांच्या त्वचेला सूज आल्यासह काही आजार निर्माण होत आहे. यामध्ये नागणी होत असल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे.

- Advertisement -

दिल्लीच्या इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णांचे वरिष्ठ त्वचा तज्ज्ञ डॉ. डीएम महाजन यांच्या म्हणण्यानुसार, ‘काही रुग्ण पहिल्यांपासूनच नागीण आजारग्रस्त राहिले आहेत. तर काही रुग्णांमध्ये पहिल्यांदाच हा आजार उद्भवला आहे. कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे दोन्ही प्रकरणे होत असल्याचे महत्त्वाचे कारण आहे.’

मुंबईच्या त्वचा तज्ज्ञ आणि हेअर ट्रांसप्लांट सर्जन डॉ. सोनाली कोहली म्हणाल्या की, ‘कोरोनामुळे कमजोर प्रतिकारशक्ती होते. यामुळे काही रुग्णांमध्ये त्वचासोबत केस आणि नखांचा आजार निर्माण होत आहे. बरे झालेल्या संसर्गग्रस्त लोकांना नागिण, केस गळणे आणि नखांमध्ये सूजन येत आहे. नखासंबंध आजार असलेल्या रुग्णांमध्ये मेलानोनीचिया या ब्यूच्या रेषा (melanonychia or Beau’s lines) पाहायला मिळत आहे. जर केस गळत असतील तर रुग्णांनी तात्काळ तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे.’

- Advertisement -

हेही वाचा – Corona Vaccination: आता १२ वर्षाखालील वयोगटाच्या मुलांनाही कोरोनाची लस; Pfizerने सुरू केली चाचणी


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -