Saturday, June 19, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश Covid-19 लस घेतल्यानंतर किती दिवसात रक्तदान करता येईल? जाणून घ्या

Covid-19 लस घेतल्यानंतर किती दिवसात रक्तदान करता येईल? जाणून घ्या

कोणताही लस घेतली तरी लसी घेत्यानंतर १४ दिवसांच्या कालावधीनंतरच त्याला रक्तदान करता येणार आहे.

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोनाला प्रतिबंधक लसीकरण मोहिम युद्धपातळीवर सुरु आहे. यात लसीकरणानंतर नागरिकांना २८ दिवसांआधी रक्तदान करता येणार नसल्याचे राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने सूचित केले होते, मात्र या नियमात बदल करत  उपलब्ध लसींपैकी दोन डोस घेल्यानंतर १४ दिवसांनी रक्तदान करु शकता येणार असल्याचे राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने (National Blood Transfusion Council) जाहीर केले आहे. त्यामुळे रक्तदाते लसीचे दोन डोस पूर्ण करून आता १४ दिवसांनी रक्तदान करु शकणार आहेत. राज्यात रक्ताचा तुटवडा अधिक वाढण्याची शक्यता आहे आणि हेच लक्षात घेत आता सरकारने कोरोना लस घेतल्यानंतर रक्तदान करण्यासंबंधी नवीन गाइडलाइन्स जारी केल्या आहे

बहुतेक देशामध्ये लसीकरणानंतर रक्तदान करण्याचा कालावधी ७ तर काही ठिकाणी १४ दिवसांचा निश्चित करण्यात आहे. मात्र भारतात लसीकरणानंतर २८ दिवसांनी रक्तदान करण्याचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. मात्र या निर्णयामुळे राज्यातील अनके रक्तपेढ्यांमध्ये रक्त तुटवड्याचे मोठे संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात होती. कारण रक्तदान करणारे बहुतेक रक्तदाते हे १८ ते ४४ वयोगटातील आहे. त्यामुळे या वयोगटातील अधिक जणांनी जर लस घेतली तर त्यांना २८ दिवसांपूर्वी रक्तदान करता येणार नव्हते म्हणून लसीकरणानंतर रक्तदान करण्याचा २८ दिवसांचा कालावधीत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे लस घेतल्यानंतर आता १४ दिवसांनी रक्तदान करत येणार राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

देशभरातील अनेक रक्तपेढी संचालक लसीकरणानंतर रक्तदान करण्याचा कालावधी २८ दिवसांपेक्षा कमी करावा यासाठी प्रयत्न करत होते त्यामुळे राज्य सरकारने हा कालावधी कमी करण्याचा स्वागतार्ह निर्णय घेतला. याबाबत बोलताना लाईफलाइन ब्लड बँकेचे वैद्यकीय संचालक डॉ. हरिश वारभे सांगतात, तरुणांनी लसीकरण करण्याआधी रक्तदान करावा असा माझा आग्रह होता.

मात्र आता लसीकरणानंतर १४ दिवसानंतर तुम्ही रक्तदान करु शकत असला तरी सर्व पात्र रक्तदात्यांनी लसीचा पहिला डोस घेण्याआधी रक्तदान करावे, कारण एक रक्तदाता पहिल्यांदा रक्तदान केल्यानंतर तीन महिन्यांचा आधी पुन्हा रक्तदान करु शकत नाही असेही लाईफलाइन ब्लड बँकेचे वैद्यकीय संचालक डॉ. हरिश वारभे म्हणाले,

रक्तदान करण्याचा नवीन गाईडलाईन्स 

- Advertisement -

१) लस घेतल्यानंतर रक्तदान करण्यासाठीचा कालावधी १४ दिवसांनी कमी केला आहे त्यामुळे रक्तदाते लसीच्या पहिल्या किंवा दोन दुसऱ्या डोसनंतर १४ दिवसांनंतर रक्तदान करू शकतात.

२) कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस ७मे रोजी घेतल्यास २१ मेनंतर रक्तदाता रक्तदान करू शकतो, आणि त्यानंतर ५ जूनला लसीचा दुसरा डोस घेऊ शकतो.

३) कोव्हिशिल्ट लसीच्या बाबतीतही रक्तदाता २१ मे रोजी रक्तदान करुन नंतर ८ ते १० आठवड्यांनंतर लसीचा दुसरा डोस घेऊ शकतात.

त्यामुळे रक्तदात्याने कोणताही लस घेतली तरी लसी घेत्यानंतर १४ दिवसांच्या कालावधीनंतरच त्याला रक्तदान करता येणार आहे.


 

- Advertisement -