घरताज्या घडामोडीभयंकर, चीनला करोना व्हायरसचा विळखा, रस्त्यांवर विखुरले मृतदेह

भयंकर, चीनला करोना व्हायरसचा विळखा, रस्त्यांवर विखुरले मृतदेह

Subscribe

संपूर्ण जगाला हादरवणाऱ्या करोना व्हायरसने चीनला विळखा घातला असून याची लागण झालेले रुग्ण रस्त्यावरच मरून पडत असल्याचे भयानक चित्र वुहान शहरात पाहायला मिळत आहे. यामुळे वुहानमधील अनेक रस्त्यांवर मृतदेह विखुरलेले दिसत आहेत.

‘द सन’ या वृत्तपत्राने याबद्दल माहिती दिली आहे. त्यानुसार शुक्रवारी मास्क लावून जाणारा एक तरुण अचानक रस्त्यात कोसळला. याबद्दल वैद्यकीय मदत पथकाला कळताच त्यांनी त्याच्याकडे धाव घेतली. पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर काहीवेळाने मदत पथकाला बुहान शहरातील दुसऱ्या भागात अशीच एक मास्क लावलेली व्यक्ती रस्त्यात पडल्याचे नागरिकांनी कळवले. त्यामुळे बचाव पथक त्याच्या मदतीसाठी तेथे गेले. पण ती व्यक्ती मृत असल्याचे समोर आले. आतापर्यंत चीनमध्ये करोना व्हायरसने २५९ लोकांचा बळी घेतला आहे. तर १२ हजार नागरिकांना त्याची लागण झाली आहे. हा व्हायरस हवेतून वेगाने पसरत असल्याने नागरिकांना मास्क लावणे गरजेचे आहे. यामुळे येथे मास्कची टंचाई निर्माण झाली आहे. चीनमधील ही गंभीर परिस्थिती पाहता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO)ने  जागतिक आणीबाणी जाहीर केली आहे. तर चीनने सर्व देशांनी जबाबदारीचे भान ठेऊन करोनावर प्रतिक्रीया द्यायला हव्यात असे सांगितले आहे.

- Advertisement -

चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी चीनमधील परदेशी नागरिकांना सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, चीनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना एअरलिफ्ट करुन भारतात आणण्यात आले आहे. दिल्लीतील छावला कॅम्पमध्ये त्यांची राहण्या खाण्याची सोय करण्यात आली आहे. इंडो तिबेट सीमा पोलिसांनी कॅम्पमध्ये ६०० खाटांची व्यवस्था केली आहे. दरम्यान चीनमधील करोना व्हायरसच्या थैमानाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने चीनमधून येणाऱ्या पर्यंटकांवर अनिश्चित काळासाठी प्रवेश बंदी घातली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -