घरदेश-विदेशइंदूरमध्ये पंतप्रधान मोदींची एक झलक पाहण्यासाठी लोक उत्सुक; 'रोड शो'मध्ये मोठी गर्दी

इंदूरमध्ये पंतप्रधान मोदींची एक झलक पाहण्यासाठी लोक उत्सुक; ‘रोड शो’मध्ये मोठी गर्दी

Subscribe

इंदूर : मध्य प्रदेशातील शाजापूरमध्ये सभेला संबोधित केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदूरमध्ये मोठा मेगा रोड शो आयोजित केला होता. या पंतप्रधानांचा बडा गणपती ते राजवाडामध्ये दरम्यान रोड शो होता. पंतप्रधान मोदी हे प्रथम इंदूरमधील बडा गणेश मंदिरात पोहोचले आणि तिथे त्यांनी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी पंतप्रधान मोदी हे खुल्या जीपमधून रोड शोसाठी सुरुवात झाली होती. पंतप्रधानांना पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केलेल्याचे पहायला मिळाले.

पंतप्रधान मोदी यांचा मेगा रोड शो बडा गणपतीपासून सुरू झाला आणि सुमारे 55 मिनिटांत 1.6 किमीचे अंतर कापून राजवाडा येथे पोहोचला. येथे मोदींनी अहिल्याबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. रोड शोच्या मार्गावर दोन्ही बाजूला भगवे झेंडे लावून भगवा कॉरिडॉर तयार करण्यात आला. रोड शोच्या मार्गावर लोकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी पंतप्रधानांवर लोकांनी पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले. या रोड शोदरम्यान मोदी-मोदीच्या यांच्या नावे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.

- Advertisement -

हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा 56 इंच छातीचा नेता राहुल गांधींना घाबरतो – संजय राऊत

- Advertisement -

पंतप्रधानांचे फुलांनी केले स्वागत

या रोड शोदरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला हजारो लोकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी लोकांनी पंतप्रधानांवर पुष्पवृष्टी करत त्यांचे स्वागत केले. स्वागताने भारावून गेलेल्या पंतप्रधानांनी हात वर करून लोकांना अभिवादन केले. मोदींच्या रोड शोबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्साह पाहयला मिळाला.

हेही वाचा – “2024 मध्ये शरद पवारांचा पक्ष अजित पवारांना माती चारणार”, संजय राऊतांचा दावा

एकापेक्षा जास्त एलपीजी सिलेंडर ठेवता येत नाही

पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सोमवारी दिवसभर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या रोड शोच्या मार्गावरील प्रत्येक घराची तपासणी करण्यात आली. यावेळी लोकांच्या घरातील एकापेक्षा जास्त एलपीजी सिलिंडर असल्यास ते काढून टाकण्यास सांगितले होते.

हेही वाचा – मुंबईत आगीचे सत्र सुरूच, भायखळ्यात मदनपुऱ्यातील इमारतीला भीषण आग

पंतप्रधानांच्या रोड शोची कडेकोट सुरक्षा

पंतप्रधान मोदींची सुरक्षा दोन थरांत होती. सर्वसामान्यांना थेट पंतप्रधानांच्या ताफ्यापर्यंत पोहोचता येणार नाही, अशा पद्धतीने बॅरिकेडिंग करण्यात आले होते. जर एखाद्या व्यक्तीने पहिला बॅरिकेड तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर त्याला दुसऱ्या थरात थांबवले जाऊ शकते. पंतप्रधानांच्या रोड शोसाठी दिल्लीहून बुलेट प्रूफ वाहनेही इंदूरला आणण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -