घरदेश-विदेशबंगालच्या विचारसरणीचे लोक पंजाबमध्ये पोहोचले : नरेंद्र मोदी

बंगालच्या विचारसरणीचे लोक पंजाबमध्ये पोहोचले : नरेंद्र मोदी

Subscribe

बंगाल सरकार राजकीय कारणांमुळे शेतकर्‍यांना फायदा होऊ देत नसल्याचाही केला आरोप

आज देशातील सर्व सरकारे केंद्र सरकारच्या कृषी योजनेशी संलग्न आहेत, पण बंगालमधील 70 लाख शेतकर्‍यांना याचा लाभ मिळत नाही. बंगाल सरकार राजकीय कारणांमुळे शेतकर्‍यांना फायदा होऊ देत नाही, असा गंभीर आरोप करतानाच बंगालच्या त्याच विचारसरणीचे लोक आज पंजाबमध्ये पोहोचले असून, आंदोलन करत आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. पंतप्रधानांनी एका कार्यक्रमात शेतकर्‍यांशी बातचीत केली, त्यावेळी ममता सरकारवर हल्लाबोल केला.

बंगालमध्ये 30 वर्षांपासून सरकार चालवणारे लोक शेतकर्‍यांच्या विषयावर कोणतीही हालचाल करत नाहीत. बंगालच्या त्याच विचारसरणीचे लोक आज पंजाबमध्ये पोहोचले असून, आंदोलन करत आहेत. बंगाल सरकार त्यांच्या राज्यातील शेतकर्‍यांचा फायदा रोखत आहे, अशी टीका मोदींनी ममता सरकारवर केली आहे. पश्चिम बंगालमधील शेतकर्‍यांना योजनांचा लाभ मिळत नाही. ममता बॅनर्जींमुळे तिथल्या शेतकर्‍यांना फायदा नाही. पश्चिम बंगाल विकासापासून वंचित आहे. पश्चिम बंगाल सरकारने जाणूनबुजून शेतकर्‍यांना योजनांपासून दूर ठेवल्याचा आरोपही मोदींनी केला आहे. काही लोक चर्चेत राहण्यासाठी कार्यक्रम आयोजित करत आहेत, ज्यांनी बंगालच्या अटीवर मौन बाळगले आहे. ते दिल्लीतील अर्थव्यवस्थेला अडचणीत आणण्याचे काम करत आहेत. ज्यांनी दिल्लीभोवती वेढा घातला आहे, त्यांना केरळ दिसत नाही. केरळमध्येही एपीएमसी ही मंडी नाही, तिथे मंडई होण्यासाठी कोणत्याही हालचाली का होत नाहीत. लोक माहिती न घेता राजकारण करून शेतकर्‍यांना फसवत असल्याचीही टीका केली.

- Advertisement -

काही लोक शेतकर्‍यांची बदनामी करून आपले राजकीय भविष्य उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करत आहेत. आधीच्या सरकारांच्या धोरणामुळे ज्या शेतकर्‍यांकडे जमीन कमी होती, ती वाया गेली. आमच्या सरकारने आधुनिक शेतीवर भर दिला. आमचे लक्ष शेतकर्‍यांचा खर्च कमी करण्यावर आहे. पीएम पीक विमा योजना, किसान कार्ड, सन्मान निधी योजनेच्या सहाय्याने शेती आणखी सोप्या पद्धतीने करता येणार असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अधोरेखित केले. आज ख्रिसमस, गीता जयंती, अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीसह इतरही अनेक चांगले प्रसंग आहेत. अटलजींनी गाव आणि गरिबांच्या विकासाला प्राधान्य दिल्याचंही मोदींनी अधोरेखित केले. अटल बिहारी वाजपेयींनी शेतकर्‍यांशी संबंधित योजनांमधील भ्रष्टाचार दूर करण्यासाठी काम केल्याचेही म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -