घरदेश-विदेशकांदा महागल्याने त्याची चक्क पूजाचं मांडली!

कांदा महागल्याने त्याची चक्क पूजाचं मांडली!

Subscribe

कांद्याची किंमत वाढल्यामुळे बिहारमधील मुझफ्फरपूर मधील लोकांनी अनोख्या प्रकारचं आंदोलन केलं आहे. शनिवारी या लोकांनी कांद्याला हार घालून त्यांची पूजा करत आंदोलन केलं. तसंच भाजीपालांना त्यांनी प्रार्थना देखील केली. याविषयी बोलताना मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक तमन्ना हाश्मी म्हणाले की, कांद्याच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. आजकाल गरीब आणि मध्यवर्गीय कुटुंबियांना कांदा खरेदी करणं खूप अवघड झालं आहे. ते फक्त आता किंमत कमी होण्यासाठी प्रार्थना करू शकतात. म्हणून कांद्याची किंमत कमी होण्यासाठी हे आंदोलन आयोजित केलं आहे.

तसंच ते पुढे असं म्हणाले की, सरकारने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन कांद्याचे दर कमी करावेत.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांमध्ये कांद्याचे दर १०० रुपये ओलांडल्यामुळे देशभरात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आली. याअगोदर समाजवादी पक्षाच्या युवा संटनेनेही उत्तर प्रदेशमधील वाराणसीतील दुकानात तारण म्हणून आधार कार्ड ठेवून कर्जावर कांदा दिला.

केंद्रीय मंत्रिमंडळाने २० नोव्हेंबर रोजी बाजारात अत्यावश्यक वस्तूंच्या किंमती लक्षात घेता १.२ लाख मेट्रिक टन कांद्याच्या आयातीला मान्यता दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – आता कांदा स्वस्त होणार!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -