भारत जोडो यात्रेची ताकद, लोकांप्रती असलेली बांधिलकी आणि… स्वरा भास्करचं ट्वीट

कॉग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रा देशभरात काढण्यात येत आहे. देशातील सत्ताधारी भाजपा आघाडीची मोट बांधण्यासाठी आणि सामान्य नागरिकांना अन्यायाविरोधात एकत्रित करण्यासाठी राहुल गांधींनी देशभर भारत जोडो यात्रा सुरु केली आहे.

कॉग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली भारत जोडो यात्रा देशभरात काढण्यात येत आहे. देशातील सत्ताधारी भाजपा आघाडीची मोट बांधण्यासाठी आणि सामान्य नागरिकांना अन्यायाविरोधात एकत्रित करण्यासाठी राहुल गांधींनी देशभर भारत जोडो यात्रा सुरु केली आहे. या भारत जोडो यात्रेत राजकीय नेत्यांसह आता बॉलिवूड कलाकारही सहभागी होताना दिसत आहेत. गुरुवारी या यात्रेत अभिनेत्री स्वरा भास्कर सहभागी झाली होती. या यात्रेनंतर स्वरा भास्करने “या यात्रेची ताकद, लोकांप्रती असलेली बांधिलकी आणि प्रेम प्रेरणा देणारे आहे. दिवसेंदिवस मिळणारा लोकांचा उदंड प्रतिसाद, कॉंग्रेस नेत्यांसोबतच सामान्य नागरिकांचा उत्साह या भारता जोडो यात्रेच्या निमित्ताने पाहायला मिळाला”, असे म्हटले.

स्वरा भास्करचे ट्विट

“भारत जोडो यात्रेत सहभाग घेऊन राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रा केली. या यात्रेची ताकद, लोकांप्रती असलेली बांधिलकी आणि प्रेम प्रेरणा देणारे आहे. दिवसेंदिवस मिळणारा लोकांचा उदंड प्रतिसाद, कॉंग्रेस नेत्यांसोबतच सामान्य नागरिकांचा उत्साह या भारता जोडो यात्रेच्या निमित्ताने पाहायला मिळाला. राहुल गांधी यांना मिळणारा नागरिकांचा प्रतिसाद आणि त्यांच्या मनात लोकांप्रती असणारे प्रेम अप्रतिम आहे. जेव्हा समाजात क्रुरपणे भयंकर गुन्हे घडतात, त्यावेळी अनेकदा अशा गंभीर गोष्टींकडे दर्लक्ष केले जाते. पण भारत जोडो यात्रा ही आशेचा किरण आहे. या यात्रेच्या माध्यमातून नफरतीचा प्रतिकार करणे शक्य होईल”, असे स्वरा भास्करने म्हटले.

भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या लोकांना फावल्या वेळेत वाचनासाठी मोबाईल लायब्ररी (फिरते वाचनालय) सुरु करण्यात आले आहे. या वाचनालयात इतिहासाशी संबंधित आणि राजकारणाची माहिती देणाऱ्या पुस्तकांचा समावेश करण्यात आला आहे.

भारत जोडो यात्रेत अभिनेत्री स्वरा भास्कर यांच्यासोबत उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत, दिग्वीजय सिंह, माजी खासदार प्रमचंद गड्डू, माहिला कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा शोभा ओझा यांनीही सहभाग घेतला होता. तसेच भारत जोडो यात्रेत सुरु करण्यात आलेल्या वाचनालयात पंडित नेहरु, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्यावरील पुस्तके नागरिकांना वाचण्यासाठी ठेवण्यात आली आहेत.


हेही वाचा – राज ठाकरेंचा आरोप धादांत खोटे; अजित पवारांचे प्रत्युत्तर